किंग खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट काल (७ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच थिएटरमध्ये किंग खानच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी चित्रपट ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहायला पसंदी दर्शवली आहे. अशातच चाहत्यांनाच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी सेलिब्रिटींना देखील चित्रपटाची क्रेझ आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील एका कलाकाराला ‘जवान’ची भूरळ पडली आहे.
कायमच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कॉमेडी शो म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कडे पाहिले जाते. शो प्रमाणेच यामधील कलाकार सुद्धा प्रचंड चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर आपल्या दमदार कॉमेडीसाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला पृथ्वीक प्रताप चर्चेत आला आहे. पृथ्वीक प्रतापला सुद्धा ‘जवान’ची भूरळ पडली आहे. पृथ्वीने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे.
पृथ्वीकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, त्याने अगदी सेम टू सेम शाहरुख सारखा ‘बाल्ड लूक’ केला आहे. या ‘बाल्ड लूक’मध्ये पृथ्वीक पूर्णपणे शाहरुख खान सारखाच नाचताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, “जवानच्या पार्श्वभूमीवर हा रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय” दरम्यान अभिनेत्याचं हे कॅप्शन प्रचंड चर्चेत आलं आहे. पृथ्वीक प्रतापच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांसह त्याच्या काही सेलिब्रिटी मित्र- मैत्रिणीनी प्रतिक्रिया दिली आहे.
सॅकल्निकच्या अहवालानुसार, हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला, तमिळ भाषेमध्ये चित्रपटाने ५ कोटींचा गल्ला, तर तेलुगू भाषेमध्येही या चित्रपटाने ५ कोटी कमावले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण ७५ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर जागतिक पातळीवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १२० कोटींचा गल्ला जमवल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.