Marathi Serial Chandravilas
Marathi Serial Chandravilas Instagram @zeemarathiofficial
मनोरंजन बातम्या

Chandravilas Title Track:सुप्रसिद्ध हिंदी गायिकेने केले मराठी शीर्षकगीताचे पार्श्वगायन

Pooja Dange

Sunidhi Chauhan Sing Marathi Title Track: मालिका जशा कथा आणि कलाकारांमुळे ओळखल्या जातात, तशाच त्या त्याच्या शीर्षकगीतामुळे देखील ओळखल्या जातात. आभाळ माया, वादळवाट, या सुखांनो या, कुंकू, उंच माझा झोका, जीव झाला वेडापिसा अशा अनेक मालिकांचे शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता मराठी मालिकेतील सुनिधी चौहान शीर्षकगीत गाणार आहे.

वैभव मांगले, सागर देशमुख आणि आभा बोडस अभिनित 'चंद्रविलास' या आगामी मालिकेचे शीर्षकगीत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहानने गायले आहे. सुनिधीने या आधी मराठी चित्रपटासाठी अनेकदा पार्श्वगायन केलेले आहे.

परंतू 'चंद्रविलास'च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय. अमोल पाठारे यांनी हे गाणे लिहिले आहे. तर प्रणव हरिदास यांनी हे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे.

‘चंद्रविलास’ ही गोष्ट आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची आहे. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतो, या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा.

त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा बाप लेकीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे.

या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.

"चंद्रविलास" एक रहस्यमय भयकथा आहे . २७ मार्चला ही मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covishield Vaccine News | कोव्हिशिल्ड लसीची निमिर्ती आणि विक्री बंद, बाजारातूनही घेणार मागे

Malegaon News Today: मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाक्यावर तुफान राडा! संतप्त स्थानिकांनी टोलनाकाच फोडला, कारण काय?

Fridge Store : फ्रिजमध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका; आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Sanju Samson Fined: पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला दुहेरी धक्का! BCCI कडून संजू सॅमसनवर मोठी कारवाई

Ravikant Tupkar: मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा, रविकांत तुपकरांनी निवडणूक आयोगाकडे का केली अशी मागणी?

SCROLL FOR NEXT