Samantha Ruth Prabhu: समांथाचे हिरेजडीत दागिने पाहिलेत का? किंमत पाहून डोळे पांढरे होतील...

सध्या समांथाचा आगामी ‘शकुंतलम’ चित्रपट बराच चर्चेत आहे. त्या मधील तिचा लूक सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Samantha Shakuntala Look
Samantha Shakuntala LookSaam Tv

Samantha Shakuntala Look: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू सध्या आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. समांथा अभिनयासोबतच डान्स मध्येही माहीर आहे. तिने आपल्या अभिनयाची छाप फक्त टॉलिवूड मध्येच नाही तर बॉलिवूड मध्येही सोडली. सध्या समांथाचा आगामी ‘शकुंतलम’ चित्रपट बराच चर्चेत आहे. त्या मधील तिचा लूक सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Samantha Shakuntala Look
Priyanka Chopra: इथे चांगले सिनेमे नाहीत म्हणून... अचानक बॉलिवूड सोडण्यावर प्रियंकाने व्यक्त केली नाराजी

समांथाचा हा ‘शकुंतलम’ चित्रपटातील लूक आहे. हा तिचा सध्या लूक सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तिचा हा आगामी चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार असून सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. समांथाच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या टीझरला आणि ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच तिच्या सध्या लूकची बरीच चर्चा होत आहे. या बिग बजेट चित्रपटात समांथाने घातलेले दागिने सर्व खरे आहे.

Samantha Shakuntala Look
Akshay Khanna Birthday: आई ठरली प्रेमकहाणीतली व्हिलन..! या अभिनेत्रीच्या आईने केला अपमान आणि अक्षय खन्नाचं ठरलेलं लग्न मोडलं

यामध्ये समांथाने घातलेल्या लूकमध्ये बिंदीपासून ते पैंजणापर्यंत दागिने परिधान केलेले दिसत आहेत. हे तिचे सर्व दागिने खरे आहेत. सोनं आणि हिऱ्यांनी बनवल्या गेलेल्या या दागिन्यांची किंमत तब्बल १४ कोटी आहे. या चित्रपटातील तिचा लूक हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला आहे.

चित्रपटात समांथाने परिधान केलेले हे दागिने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. याची किंमत ऐकून तिचे चाहते आणि सर्व प्रेक्षक आवाक झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com