Priyanka Chopra: इथे चांगले सिनेमे नाहीत म्हणून... अचानक बॉलिवूड सोडण्यावर प्रियंकाने व्यक्त केली नाराजी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडमधून हॉलिवूडमधील पदार्पणावर भाष्य केले आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv

Priyanka Chopra: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे प्रकाशझोतात असते. प्रियंकाने हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. फॅशन, बर्फी असे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्या नंतर प्रियंकाने अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रित पाऊल ठेवत आपली ओळख निर्माण केली. प्रियांका बॉलिवूड सोडून परदेशात का गेली, यामुळे ही चाहते बरेच विचारात पडले होते. नुकतेच तिने यासर्वांवर भाष्य केले आहे.

Priyanka Chopra
Ruchismita Guru: आकांक्षा दुबेनंतर पुन्हा फिल्म इंडस्ट्रीला धक्का; नातेवाइकाच्या घरात अभिनेत्रीचा मृतदेह आढळला

2012 मध्ये प्रियांकाने 'इन माय सिटी' या गाण्यातून आंतरराष्ट्रीय म्यूझिक इंडस्ट्रित पदार्पण केले. प्रियांका चोप्राने आता इतक्या वर्षांनी आपले मौन तोडले असून तिने बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले आहे. यावेळी तिने अमेरिकेत स्वतःसाठी काम का शोधायला सुरुवात केली हे देखील प्रियांकाने स्पष्ट केले आहे. प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमुळे बरीच चर्चेत आहे.

अलीकडेच, या वेबसीरिज निमित्त एका आंतरराष्ट्रीय पॉडकास्टमध्ये तिने संवाद साधला होता, त्यावेळी प्रियंकाने तिच्या फिल्मी कारकिर्दीत यश मिळाले असतानाही एका हॉलिवूड गाण्यासाठी बॉलिवूड का सोडले आणि अमेरिकेत कामाच्या शोधात का होती यावर भाष्य केले आहे. प्रियांकाने तिला बॉलिवूडमध्ये ज्याप्रकारचे चित्रपट आणि वेबसीरिज मिळत होते, त्या कामावर ती खूश नव्हती. मुलाखतीत तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये तुलना करत असताना पहिल्यांदाच यावर प्रियंका मनमोकळेपणाने बोलली आहे.

Priyanka Chopra
Ajay Devgn Movie: हिट चित्रपट देणाऱ्या अजयचा रखडलेला 'मैदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियांका मुलाखतीत म्हणते, ‘‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्याने एकदा मला एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले आणि फोन केला. त्यावेळी मी ‘सात खून माफ’चे शूटिंग करत होते. फोन करुन अंजलीने विचारले की, अमेरिकेत म्युझिक इंडस्ट्रित डेब्यू करायला आवडेल का. त्यावेळी मी बॉलिवूड सोडण्याच्या मूडमध्ये होते. कशाप्रकारे मला बॉलिवूड सोडता येईल याचा विचार करत होते. मला बॉलिवूडमध्ये नेहमीच एका कोपऱ्यात ढकलले जात होते. अनेक दिग्दर्शक मला कास्ट करत नव्हते. अनेकांना माझ्या विरोधात तक्रारी होत्या. मी अखेर त्यातून ब्रेक घेण्याचा विचार केला आणि एक्झिट घेतली.’

पुढे प्रियंका म्हणते, ‘अखेर मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि संगीत क्षेत्राने माझ्या सिनेकारकिर्दिला नवं चैतन्य दिलं. असे अनेक चित्रपट होते, त्यात मला आवड नव्हती. माझ्या कामावर आणि माझ्या अभिनयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तोपर्यंत मला बराच काळ सिनेसृष्टीत काम करून झाला होता, म्हणूनच जेव्हा हॉलिवूडमधून म्यूझिकची ऑफर मिळाली तेव्हा मी कोणताही विचार न करता अमेरिकेत निघून गेली.’

Priyanka Chopra
Madhuri Dixit: माधुरीबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरणं नेटफ्लिक्सला भोवलं; कायदेशीर नोटीस देत दिला दणका

प्रियांका चोप्राने अनेक आंतरराष्ट्रीय गायकांसोबत काम केले आहे. पण ती म्यूझिक इंडस्ट्रित आपली जादू दाखवण्यासाठी अयशस्वी ठरली. त्यानंतर प्रियांका हॉलिवूडमध्येच अभिनयात नशीब आजमावले. प्रियांकाने अनेक प्रयत्न करून एबीसीची 'क्वांटिको' ही मालिका मिळवली. त्यानंतर हॉलिवूडमध्ये प्रियांकाने मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरिज केले आहेत. ‘सिटाडेल’ व्यतिरिक्त प्रियांका मे 2023 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘लव्ह अगेन’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com