Madhuri Dixit: माधुरीबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरणं नेटफ्लिक्सला भोवलं; कायदेशीर नोटीस देत दिला दणका

एका राजकीय विश्लेषकाने नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग कंपनीला ‘द बिग बँग थिअरी’च्या एका एपिसोडबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असून, माधुरी दीक्षितबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरल्याचा दावा केला आहे.
Madhuri Dixit
Madhuri Dixit Instagram

Madhuri Dixit: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या चाहत्यांमध्ये आजही तिची क्रेझ कायम आहे. माधुरीच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची अनेकदा चर्चा होते. दरम्यान, एका राजकीय विश्लेषकाने नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग कंपनीला ‘द बिग बँग थिअरी’च्या एका एपिसोडबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असून, माधुरी दीक्षितबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरल्याचा दावा केला आहे.

Madhuri Dixit
Shah Rukh Khan: पठान खुश हुआ! सिनेमाच्या यशानंतर शाहरुने स्वतःला दिलं 'हे' महागडे गिफ्ट

याबद्दल माधुरीच्या चाहत्यांना माहिती मिळताच तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा देत आहे. राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी या शोच्या दुसऱ्या सीझनचा पहिला भाग काढून टाकण्याची विनंती करणारी कायदेशीर नोटीस दाखल केली आहे, ज्यामध्ये कुणाल नय्यरने साकारलेली राज कूथरापल्ली आणि शेल्डन कूपरने साकारलेली जिम पार्सन्सने ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची तुलना केली आहे.

Madhuri Dixit
MM Keeravani: प्रवास आणि अतिउत्साह नडला.. ऑस्कर विजेते एमएम कीरावानी यांना कोरोनाची लागण

नेटफ्लिक्सला पाठवलेल्या नोटीसची प्रिंट राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी ट्वीट करत आपले म्हणणे मांडले, “नुकताच मी नेटफ्लिक्सवर ‘द बिग बँग थिअरी’या शोचा एक भाग पाहिला ज्यामध्ये कुणाल नय्यरच्या पात्राने बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री दाखवण्यासाठी अपमानास्पद शब्द वापरला आहे. लहानपणापासूनच मी माधुरी दीक्षितचा फॅन असल्याने डायलॉग ऐकून खूप नाराज झालो.”

सोबतच ते पुढे म्हणतात, “भारतीय संस्कृतीत आपल्याला महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे. म्हणून मी माझ्या वकिलाला नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितले आणि त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तो भाग काढून टाकण्याची विनंती केली. मीडिया कंपन्यांना मिळालेल्या कंटेंटसाठी त्यांना जबाबदार धरणे आवश्यक आहे. मला अपेक्षा आहे की नेटफ्लिक्स इंडिया ही बाब गांभीर्याने घेईल.”

राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये, चारित्र्यावर केलेली टिप्पणी केवळ आक्षेपार्ह्य नाही तर मानहानीचा खटलाही आहे. त्यांनी नेटफ्लिक्सला एपिसोड काढून टाकण्याची विनंती केली आहे. तसे न केल्यास महिलांविरुद्ध होत असणाऱ्या भेदभावाला चालना देण्यासाठी कायदेशीर कारवाई करु असा सक्त इशाराही दिला आहे. नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणावर टिप्पणीसाठी नेटफ्लिक्सशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com