Palak Muchhal Saves 3000 Lives Of Children Saam TV
मनोरंजन बातम्या

Singer Palak Muchhal: प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने ३००० मुलांचे वाचवले प्राण, होतोय कौतुकाचा वर्षाव

Palak Muchhal Saves 3000 Lives Of Childrens: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलच्या सामाजिक कार्याची कहाणीच खूपच जबरदस्त आहे. पलकने तब्बल ३००० मुलांना जीवनदान दिले आहे. या मुलांची हार्ट सर्जरी करत पलकने त्यांना नवं आयुष्य दिले आहे.

Priya More

बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक सेलिब्रिटी असे आहेत जे आपल्या कामासोबत सामाजिक कार्यात देखील पुढे आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत ते मदत देखील करतात. या सेलिब्रिटींनीमध्ये सोनू सूद (Sonu Sood), सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांची नावे पुढे येतात. आता या लिस्टमध्ये आणखी एका प्रसिद्ध गायिकेच्या नावाचा समावेश झाला आहे. ही गायिका म्हणजे पलक मुच्छल (Palak Muchhal). पलक मुच्छलच्या सामाजिक कार्याची कहाणीच खूपच जबरदस्त आहे. पलकने तब्बल ३००० मुलांना जीवनदान दिले आहे. या मुलांची हार्ट सर्जरी करत पलकने त्यांना नवं आयुष्य दिले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेली प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर पलक मुच्छलने एक नवा विक्रम केला आहे. यावेळी तिने गायनात नव्हे तर सेवाक्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. याबाबतची माहिती स्वत: पलकने तिच्या सोशल मीडियावरून दिली आहे. आपल्या गायकीची जादू दाखवणारी गायिका पलक मुच्छल ‘पलक मुच्छल हार्ट फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची मालकही आहे. ही संस्था हृदयविकाराने त्रस्त असलेल्या मुलांना मदत करते. पलकच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत ३००० जीव वाचले आहेत. पलकच्या संस्थेने आतापर्यंत ३००० मुलांना हृदयाशी संबंधित शस्त्रक्रियेमध्ये मदत केली आहे.

पलकने 11 जून रोजी तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ आलोक साहू नावाच्या चिमुकल्या मुलाच्या शस्त्रक्रियेचा होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पलकने लिहिले की, '३००० जीव वाचले. आलोकसाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.'

पलक मुच्छलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, 'तिने सुरू केलेले सेवाकार्य हा एक उपक्रम होता. ज्याचे आता मिशनमध्ये रूपांतर झाले आहे.' या कामासाठी पलकला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३००० मुलांचे हार्ट सर्जरीद्वारे प्राण वाचवणाऱ्या पलकला अजून ४०० मुलांवर उपचार करायचे आहेत. सध्या ही मुले उपचारासाठी वेटिंगमध्ये आहेत. पलकने सांगितले होते की, 'माझी प्रत्येक कॉन्सर्ट या मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेला समर्पित आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT