आपल्या मधूर आवाजाच्या माध्यमातून बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (alka yagnik) यांनी आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. ९० च्या दशकातील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांच्या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळते. 20 मार्च रोजी जन्मलेल्या अलका याज्ञिक लहानपणापासूनच रसिकांच्या हृदयात आपल्या वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलका याज्ञिक यांनी बॉलिवूड चित्रपटातील रोमँटिक गाण्यांपासून ते सर्व प्रकारच्या गाण्यांना आपला मधुर आवाज दिला आहे.
प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना सात वेळा 'फिल्मफेअर अवॉर्ड', 'लता मंगेशकर अवॉर्ड', 'आयफा अवॉर्ड', 'स्टार स्क्रीन अवॉर्ड' आणि 'झी सिने अवॉर्ड' मिळाले आहेत. अलका याज्ञिक आज आपला 59 वा वाढदिवस (alka yagnik birthday) साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांचे करिअर आणि त्यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत...
अलका याज्ञिक वयाच्या 6 वर्षांपासून गाणं गात आहेत. या गायिकेने प्रत्येक वेळी आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. 6 वर्षांची छोटी अलका याज्ञिक आकाशवाणीसाठी गाणं गाायच्या. 10 वर्षांच्या असताना त्या मुंबईत आल्या. 10 वर्षांच्या अलका याज्ञिक या राज कपूर यांना पहिल्यांदा भेटल्या. तेव्हा अलका यांचा आवाज ऐकून राज कपूर यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी अलकाला थेट प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे पाठवले. संगीत दिग्दर्शक अलकाच्या आवाजाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिच्या आईसमोर दोन पर्याय मांडले.
प्यारेलाल यांनी अलका यांना चित्रपटामध्ये गाणं गाण्याची संधी दिली. वयाच्या १४ व्या वर्षी अलका यांनी ‘पायल की झंकार’ चित्रपटातील ‘थिरकट अंग लचक झुकी’ हे गाणं गायलं. यानंतर त्यांनी १९८१ मध्ये ‘लावारीस’ चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणं गायलं. मात्र, त्यांना खरे यश 'तेजाब'च्या 'एक दो तीन' या गाण्याने मिळाले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली.
अल्का याज्ञिक एका गाण्यासाठी 12 लाख रुपये फी घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलका याज्ञिक 82 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्या महिन्याला 24 लाख रुपये कमवतात. तर अलका यांची वार्षिक कमाई 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आजही त्यांच्या गाण्याचे अनेक कार्यक्रम होतात. त्याचसोबत त्या चित्रपटामध्ये देखील गाणी गातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.