Abhishek Bachchan Why Liked Divorce Related Post Instagram
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan And Aishwarya Rai : अभिषेकने 'त्या' घटस्फोटाच्या पोस्टला का लाईक केलं ? सत्य आलं समोर; ऐश्वर्यासोबत आहे जवळचा संबंध

Abhishek Bachchan Why Liked Divorce Related Post : सोशल मीडियासह सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अभिषेकने गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोटासंबंधित पोस्ट लाईक केल्यामुळे अधिकच चर्चा होत आहे.

Chetan Bodke

सोशल मीडियासह सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशाही अफवा सुरु आहेत की, ते दोघंही घटस्फोट घेणार आहेत. याची चर्चा सुरू झाली, अनंत- राधिकाच्या लग्नापासून. लग्नामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन कुटुंबीयांसोबत एकत्र दिसल्या नव्हत्या. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांमध्ये काही वाद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अभिषेक बच्चनने नुकतेच घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केल्यामुळे अधिकच चर्चा होत आहे. मात्र, अभिषेकने इन्स्टाग्रामवरील लाईक केलेली ती पोस्ट ज्या व्यक्तीची आहे त्याचे ऐश्वर्यासोबत खूप चांगले संबंध आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा करण्यात आला आहे की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आलबेल सुरू नसल्याचे दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने लेखिका हिना खंडेलवाल हिच्या एका पोस्टला लाईक केले होते. त्या पोस्टमध्ये, त्या लेखिकेने ग्रे डिव्होर्सच्या वाढत्या प्रकरणाबाबत सविस्तर लिहिलं होतं. अशातच आता या ग्रे डिव्होर्सबद्दल एका रेडिट पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, अभिषेकने ही पोस्ट लाइक केली म्हणजे, ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होतोय असं नाही. ही पोस्ट ऐश्वर्याचा चांगला मित्र जिरक मार्कर याने हा लेख लिहिला आहे. ज्याचा इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.

अभिनेत्याला ही पोस्ट आवडल्यामुळे त्याने ह्या पोस्टला लाईक केले आहे. जिरक पेशाने हेल्थ स्पेशलिस्ट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फारूख शेख यांच्या झालेल्या 'जीना इसी का नाम' या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी मैत्रीसंदर्भात गप्पादेखील केल्या ऐश्वर्याच्या जवळच्याच मित्राने लिहलेल्या पोस्टला अभिषेकने लाईक केले आहे. त्यामुळे खरंच ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, अभिषेक आणि जिरक एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. मात्र, ऐश्वर्या तिच्या मित्राला फॉलो करत नाही. ती इन्स्टाग्रामवर फक्त एकालाच फॉलो करते ती म्हणजे तिचा पती अभिषेक बच्चन. मुख्य बाब म्हणजे ऐश्वर्या सासरे अमिताभ बच्चन यांना देखील फॉलो करत नाही. नेटकऱ्यांमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्यामुळे दुरावा आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT