Adipurush Movie Release Date Declared
Adipurush Movie Release Date Declared Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush: आदिपुरुष सिनेमाचे काऊंटडाऊन सुरु; फक्त १५० दिवस बाकी...

Chetan Bodke

Adipurush: प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाला नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते. चित्रपटातील काही प्रमुख भूमिका आणि चित्रपटातील व्हिएफएक्समुळे नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते. निर्मात्यांनी चित्रपटात बदल करण्याचा निर्णय घेत प्रदर्शनाच्याही तारखेत त्यांनी बदल केला होता. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. १६ जून रोजी चित्रपट 3D आणि 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान आणि क्रिती सेननही दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यानंतर ही चित्रपट बरेच दिवस चर्चेत राहिला होता.

चित्रपटात प्रभास रामलल्लांच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत, सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत असून देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे संवाद मनोज मुंतसीर यांचे असून पटकथा ओम राऊत यांची आहे.

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यामध्ये सैफ अली खान रावणाच्या लूकवरून वादात सापडला होता. यावरून नेटकऱ्यांनी सैफ सह निर्मात्यांना सोशल मीडियावर बरेच ट्रोल केले होते. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मोठ्या ब्रेकनंतर आता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. आदिपुरुष 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 3D आणि 2D मध्ये प्रदर्शित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT