Bollywood Celebrity Income: 'हे' कलाकार चित्रपटातूनच नाही तर इथूनही कमवतात बक्कळ पैसा, किंमत ऐकाल तर येईल आकडी...

बॉलिवूड कलाकारांची कमाई ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
Bollywood Celebrity Bollywood Celebrity
Bollywood Celebrity Bollywood CelebritySaam Tv
Published on

Bollywood Celebrity Advertise Income: बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स संपत्तीच्या बाबतीत खूप श्रीमंत आहेत. बॉलिवूडचे हे सर्व सुपरस्टार करोडोंमध्ये खेळतात. यासोबतच त्यांना लक्झरी लाइफ जगायला देखील फार आवडते.  बॉलिवूडमधील काही सुपरस्टार्स त्यांच्या एका चित्रपटासाठी करोडो रुपयांची भरमसाठ फी घेतात, पण तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या कमाईचा स्रोत केवळ चित्रपटच नाही तर जाहिराती देखील आहेत.

Bollywood Celebrity Bollywood Celebrity
Javed Akhtar Birthday: शबाना आझमींनी दिला उत्कृष्ट नात्यांचा कानमंत्र...

हे स्टार्स जाहिरातींमधूनही बऱ्यापैकी कमाई करतात. बॉलिवूड स्टार्स अनेक प्रकारे पैसे कमवत असले तरी त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त ते दुसऱ्या क्रमांकावरील जाहिरातींच्या माध्यमातून मोठी कमाई करतात. कधी कधी ते कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा जाहिरातींमधून जास्त कमाई करतात. अशा परिस्थितीत हे बॉलिवूड स्टार्स जाहिरातींमधून किती कमावतात हे जाणून घेऊया.

Bollywood Celebrity Bollywood Celebrity
Bholaa Motion Poster: तब्बूच्या 'भोला'मधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, दिसणार डॅशिंग अवतारात...
Amitabh Bachchan Photos
Amitabh Bachchan PhotosSaam Tv

या यादीत पहिले बिग बी अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात. चित्रपटांव्यतिरिक्त बिग बी टीव्ही शोमधूनही कमाई करतात. या सगळ्यासोबतच अमिताभ बच्चन जाहिरातींच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतात.  रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन एका जाहिरातीसाठी 3 ते 4 कोटी रुपये भरमसाठ फी घेतात.

Aamir Khan Photos
Aamir Khan PhotosSaam Tv

या यादीत बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानचे नाव देखील आहे. आमिर खान करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आमिर खान जाहिराती, निर्माते आणि स्टेज परफॉर्मन्समधून कमाई करतो. आमिर खानने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, आमिर खान एका जाहिरातीसाठी 2 ते 7 कोटी इतके मानधन आकारतो. अनेक जाहिरातींसाठी आमिरने 10 ते 11 कोटी इतकी मोठी रक्कमही घेतली आहे.

Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanInstagram

मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या रायचे नावही यामध्ये सामील आहे. ऐश्वर्या राय बच्चनही जाहिरातींसाठी भरमसाठ फी आकारते. ऐश्वर्याने आत्तापर्यंत अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही केल्या आहेत, ज्यातून तिने करोडो रुपये कमावले आहेत. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चन एका जाहिरात शूटसाठी दररोज 2 ते 6 कोटी रुपये घेते.

Shah Rukh Khan Twitter
Shah Rukh Khan Twitter Saam Tv

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा किंग खान चित्रपटांसोबतच जाहिरातींमधूनही करोडोंची कमाई करतो. शाहरुख हा आज इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक ओळखला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख एका जाहिरातीसाठी दिवसाला ४ ते १० कोटी रुपये घेतो. शाहरुख खानने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत.

Akshay Kumar News, Bollywood News
Akshay Kumar News, Bollywood News Akshay Kumar Instagram

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे नावही या यादीत आहे. कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये अव्वल आहे. एका वर्षात अनेक चित्रपट आणि टीव्ही शो करून तो भरपूर पैसा कमावतो. यासोबतच तो जाहिरातींच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. जाहिरातींबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार एका जाहिरातीसाठी 5 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com