Article 370 Movie saam tv
मनोरंजन बातम्या

Article 370: यामी गौतमीच्या 'आर्टिकल 370'मध्ये किरण करमरकर अमित शहांच्या भूमिकेत, लूक पाहून तुम्हीही व्हाल चकीत

Kiran Karmarkar First Look Form Article 370: काही दिवसांपूर्वी यामी गौतमीच्या या चित्रपटाचा ट्रेलर (Article 370 Trailer) रिलीज झाला. ट्रेलरमध्ये यामी गौतमचा बिनधास्त आणि निडर अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये यामी गौतमीसोबत अेक कलाकार उत्कृष्ट भूमिकेत दिसणार आहेत.

Priya More

Article 370 Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामी गौतमचा 'आर्टिकल 370' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी यामी गौतमीच्या या चित्रपटाचा ट्रेलर (Article 370 Trailer) रिलीज झाला. ट्रेलरमध्ये यामी गौतमचा बिनधास्त आणि निडर अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये यामी गौतमीसोबत अेक कलाकार उत्कृष्ट भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी देखील दिसणार आहे. आता या चित्रपटामध्ये अभिनेता किरण करमरकर अमित शाह यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटात किरण करमरकर (Kiran Karmarkar) अमित शाह (Amit Shah) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक चाहत्यांना प्रभावित करत आहे. यामी गौतम स्टारर 'आर्टिकल 370' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य झांबळे यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती आदित्य धरने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच खळबळ माजवत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

या चित्रपटातील प्रिया मणी, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेतील अरुण गोविल यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ट्रेलरमधील त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले अशामध्ये आता या चित्रपटातील आणखी एका व्यक्तीचा आकर्षक लूक समोर आला आहे. किरण करमरकर हे या चित्रपटात अमित शाह यांची भूमिका साकारणार असून ते हुबेहुब त्यांच्या सारखेच दिसत आहेत. या भूमिकेसाठी चाहते किरणच्या आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय परिवर्तनाकडे लक्ष वेधून रील बनवत आहेत.

सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या आसपासच्या घटनांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे काम करणाऱ्या सर्वांची कहाणी या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. जिओ स्टुडिओ आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइकच्या निर्मात्यांकडून 'आर्टिकल 370' हा एक उच्च ऑक्टेन ॲक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे ज्यामध्ये अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित आहे. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT