Ajay Devgan And Ileana Dcruz Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raid 2 Movie: 'रेड 2' मध्ये इलियाना डिक्रुझ नाही तर या अभिनेत्रीने केली एन्ट्री, मुंबईमध्ये शूटिंगला सुरूवात

Actress Vaani Kapoor: सहा वर्षांनंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच 'रेड 2' चित्रपट (Raid 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे.

Priya More

Raid 2 Actress:

बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgan) 2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'रेड' चित्रपट (Raid Movie) सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली ह होती. सहा वर्षांनंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच 'रेड 2' चित्रपट (Raid 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे. रेड चित्रपटामध्ये इलियाना डिक्रूझने मुख्य भूमिका साकारली होती. पण आता 'रेड 2' चित्रपटामध्ये इलियाना डिक्रूझची जागा दुसऱ्याच अभिनेत्रीने घेतली आहे.

अजय देवगणच्या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'रेड 2'चे शूटिंग सुरू झाले आहे. अजय देवगणने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'रेड 2' चित्रपटाच्या शूटिंगची माहिती दिली होती. आता या चित्रपटाचे एक मोठे अपडेट आले आहे. खरंतर 'रेड 2' या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 'रेड' चित्रपटात दिसलेली इलियाना डिक्रूझ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार नाही. या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार हे आपण जाणून घेणार आहोत...

अजय देवगणचा 'रेड' चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याच्या सिक्वेलची मागणी करत होते. आता अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा होताच चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीचे फोटो शेअर केले होते. 'रेड 2' या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितले की, 'वाणी कपूर 'रेड 2' चित्रपटात दिसणार आहे. ती अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे.' 'रेड' या चित्रपटात दिसलेली इलियान डिक्रूझने 'रेड 2' चित्रपटात ब्रेक घेतला असल्याचे बोलले जात आहे.

अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू झाले आहे. चित्रपटाचे सुरूवातीचे शूटिंग मुंबईत होणार असून त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांचे शूटिंग होणार आहे. राजकुमार गुप्ता अजय देवगणचा 'रेड 2' चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. राजकुमार गुप्ता यांनीच या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होते. 'रेड 2' चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी टी-सीरीजच्या सहकार्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT