बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे (Main Atal Hoon Movie) सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘मैं अटल हूं’ या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी हे हुबेहुब अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दिसत आहे. या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी हाच योग्य पर्याय का होता यामागचे कारण दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितले. त्यांनी सांगितलं की, 'जेव्हा निर्मात्यांनी मला अटलबिहारी वाजपेयींवर चित्रपट तयार करण्यासाठी संपर्क साधला. तेव्हा पंकज त्रिपाठी हा त्यांचा तात्काळ पर्याय होता आणि मी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. अटलजी आणि पंकज त्रिपाठी हे दोघेही लहान शहरातून मोठे यश मिळवण्यासाठी आले आहेत. त्यांचे देशाशी एक घट्ट नाते आहे.'
रवी जाधव यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'पंकज त्रिपाठी यांचे पारदर्शक व्यक्तिमत्व त्यांना अटलजींना पडद्यावर साकारण्यासाठी अद्वितीयपणे पात्र ठरते. त्यामुळे माझ्यासाठी आणि निर्मात्यांसाठी पंकज त्रिपाठी हाच 'मैं अटल हूं'साठी एकमेव पर्याय होता. पंकज त्रिपाठीच्या फर्स्ट लूक इमेजने पुष्टी केली की आम्ही योग्य निर्णय घेतला आहे.' प्रेक्षकांना देखील पंकज त्रिपाठीचा अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा लूक प्रचंड आवडत आहे. ट्रेलरमध्ये देखील त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे.
दरम्यान, हा चित्रपट पुढच्या वर्षी 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांच्या गीतांसह संगीत दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.