Urfi Javed - Rajpal Yadav Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Look: उर्फी बनली 'छोटा पंडित'; 'Bhool Bhulaiyaa'चा लूक होतोय व्हायरल, पाहा VIDEO

Urfi Javed Bhool Bhulaiyaa Look: उर्फीने भुलभुलैय्या चित्रपटातील छोटा पंडितच्या गेटअप केला आहे.

Pooja Dange

Urfi Javed Recreated Rajpal Yadav Look In Bhool Bhulaiyaa Movie:

उर्फी जावेद नेहमीच काही ना काही अतरंगी करत असते. तिच्या अतरंगी लूक्स आणि फॅशनचे नेहमी चर्चा असते. उर्फी असं काहीतरी करते ज्याचा कोणी विचारच करू शकत नाही. तिचा अशाच भन्नाट लूकने सगळे शॉक झाले आहे.

उर्फी जावेदने चक्क राजपाल यादवचा लूक केला. उर्फीने भुलभुलैय्या चित्रपटातील छोटा पंडितच्या गेटअप केला आहे. तिचा हा गेटअप पाहून तुम्ही देखील काही क्षण विचारात पडालं.

उर्फी जावेदने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने लाल रंगाचं फुल स्लीव्हज असलेला बॉडी फिट टॉप घातला आहे. तर त्याखाली भगव्या रंगाचं धोतर घातलं आहे. गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार आहे. केसात पेटती अगरबत्ती लावली आहे.

या सगळ्या उर्फीचा चेहरा फारच विनोदी दिसत आहे. तिने संपूर्ण चेहऱ्याला लाल रंग लावला आहे. भुवया देखील डार्क केल्या आहेत आणि अगदी छोट्या मिश्या लावल्या आहेत. राजपाल यादवच्या लूकपेक्षा जास्त विनोदी दिसत आहे. उर्फीने तो उत्तमरीत्या कॅरी देखील केला आहे. (Latest Entertainment News)

'तुम्हा सर्वांना 'भुलभुलैय्या' या चित्रपटातील छोटा पंडित हे पात्र माहीतच असेल. खूप मेहनत करून हॅलोविन पार्टीसाठी हा लुक तयार केला होता. पण जाऊ शकले नाही म्हणून हा व्हिडीओ शेअर केला.' असे कॅप्शन उर्फीने तिच्या तिचे लूकविषयी आणि तो का केला आहे हे सांगितले.

उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी हेरा फेरी चित्रपटातील (Movie) बाबू भय्या यांचा लूक केला होता. तिचा तो लूक देखील खूप व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT