Katrina Kaif First Look From Tiger 3: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 New Poster: 'टायगर ३'मधील कतरीना कैफचा फर्स्ट लूक समोर, हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसली झोया

Katrina Kaif First Look From Tiger 3: या पोस्टरमध्ये झोया अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. कतरिनाचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे.

Priya More

Tiger 3 Movie Trailer Release Date:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे सुपर-स्पाय कपल टायगर आणि झोयाच्या भूमिकेत लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. सलमान आणि कतरिना कैफच्या 'टायगर ३' चित्रपटासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान त्याचा फ्लॉप ठरलेला 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची कमी भरून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशामध्ये आज निर्मात्यांनी या चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कतरिना कैफचा फर्स्ट लूक (katrina kaif first look poster) समोर आला आहे. या पोस्टरमध्ये (Tiger 3 New Poster) झोया अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

'टायगर' फ्रँचायझीच्या 'टायगर ३' चित्रपटाबद्दल चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 'टायगर ३'चे फर्स्ट लूक पोस्टर २ सप्टेंबर २०२३ रोजी यशराज फिल्म्सने त्यांच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त रिलीज केले होते. पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना जबरदस्त स्टाईलमध्ये दिसले. आता या चित्रपटातील कतरिनाचा सोलो फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. तिचे हे पोस्टर व्हायरल होत असून सध्या त्याची चर्चा सुरू आहे.

कतरिना कैफने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फायटिंग विथ फायर, तीच झोया.' पोस्टरमध्ये कतरिना कैफ दोरीच्या सहाय्याने हवेत लटकताना आणि हातामध्ये बंदूक घेऊन बेछूट गोळीबार करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या स्टाईलने चाहते वेडे झाले असून काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कतरिनाच्या लूकला लाखो लाईक्स मिळाले आहेत. कतरिनाच्या पोस्टला २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दुसरीकडे, सलमान खानने देखील इन्स्टाग्रामवर कतरिनाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असल्याचे जाहीर केले आहे. आता सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.

हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी म्हणजे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. त्याचा तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट फक्त हिंदी भाषेत नाही तर तमिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT