बॉलिवूडच्या एव्हरग्रीन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. रेखा यांचं फिल्मी आयुष्य जेवढं चर्चेत राहिलं तितकंच त्याचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं. बाल कलाकार म्हणून त्यांच्या सिनेकरियरला सुरुवात झाली होती. कायमच त्यांना बॉलिवूडमध्ये रेखा म्हणूनच हाक मारली जाते. अनेकांना त्यांचं आडनाव माहित नाही. पण, त्या कधीच आपलं आडनाव वापरत नाहीत, यामागील कारण फारसं कुणाला माहित नाही.
रेखा कायमच चाहत्यांमध्ये ग्लॅमरस लूक, अफेअर्स, ॲक्टिंग आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या आडनावाबद्दल सांगितले होते. रेखा यांच्या वडीलांचे नाव जेमिनी गणेशन, जेमिनी गणेशन हे तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. तर आई पुष्पवल्ली गणेशन यासुद्धा टॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये छोट्या भूमिका साकारायच्या. अभिनेत्री रेखा यांचं पूर्ण नाव भानुरेखा जेमिनी गणेशन असे आहे, पण त्यांचं हे नाव फारसं कोणाला माहित नाही. पण, रेखा यांनी कधीही आपले पूर्ण नाव किंवा आडनाव वापरले नाही.
वडील जेमिनी गणेशन यांनी रेखा लहान असताना, त्यांना आणि त्यांच्या आईला सोडले होते. त्यामुळे त्यांचे बालपण अनेक अडचणींनी भरलेले होते. वडीलांनी रेखा आणि त्यांच्या आईला सोडल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली होती. जेमिनी गणेशन रेखा यांना कधीच आपली मुलगी मानत नव्हते. ज्यावेळी रेखा यांचा जन्म झाला, तेव्हा तिच्या आई- वडीलांचे लग्न झालेले नव्हते. जेमिनी गणेशन यांचे खासगी आयुष्यामध्ये अनेक लग्न झाले होते. त्यांनी रेखाच्या आईला (पुष्पवल्ली) कधीच आपली पत्नी मानली नव्हती.
लहानपणापासूनच रेखा यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल होते. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे रेखा यांच्या आईने त्यांना कमी वयातच काम करण्यास सांगितले. आई आमच्या फॅमिलीमध्ये एकमेव कमावती होती, त्यामुळे वयाच्या ९व्या वर्षी रेखाला आपले शिक्षण सोडून चित्रपटांमध्ये काम करायला लागले. फार कमी वयातच बॉलिवूडमध्ये डेब्यु करत रेखा यांनी ५० वर्षांपेक्षा अधिकच्या सिनेकारकिर्दिमध्ये तब्बल ४००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेय. या कारणामुळे रेखा कधीही वडीलांचे आडनाव लावत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.