Tiger 3  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Box Office Collection Day 4: 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवर सुसाट, सलमान खानच्या चित्रपटाने चौथ्या दिवशी केली बक्कळ कमाई

Salman Khan Tiger 3 Movie: या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सलमान खानसाठी खूपच चांगली ठरली आहे.

Priya More

Salman Khan Tiger 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतीक्षित चित्रपट 'टायगर ३' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर मोठी गर्दी करत आहेत.

या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सलमान खानसाठी खूपच चांगली ठरली आहे. सलमानच्या चाहत्यांनी टायगर ३ पाहून त्यांची दिवाळी साजरी केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिल्कच्या प्राथमिक माहितीनुसार, 'टायगर ३' ने चौथ्या दिवशी भारतात 22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर एकूण कमाई १६०.५० कोटी रुपये झाली आहे. तर जगभरात हा आकडा ३०० कोटींच्या पुढे गेला आहे. टायगर ३ चित्रपटाने इतर चित्रपटांना मागे टाकत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट ३०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. आता या चित्रपटाची पहिल्या ४ दिवसांची कमाई पाहून हा चित्रपट येत्या काही दिवसांत चांगली कमाई करेल याचा अंदाज येतोय.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर 'टायगर ३' ने पहिल्या दिवशी ४४.५ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५९ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी ४४ कोटींची कमाई केली. दरम्यान, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सलमान खानने टायगर ३ च्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले होते. या चित्रपटाचा शो सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाला होता आणि तो देखील हाऊसफुल्ल होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT