ott platform Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Webseries: 'मिर्झापूर सीझन ३' वेबसीरिजला सर्वोच्च न्यायलयाकडून दिलासा; बंदी घालण्यास कोर्टाचा नकार

वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली असून मिर्झापूर येथील एका रहिवाश्याने ही याचिका दाखल केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या भारतात ओटीटी (OTT) विश्वात बरेच नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत (Bollywood). प्रेक्षकांना सध्या गुन्हेगारी विश्वातील आशय पाहण्यासाठी भरपूर प्रिय असल्याचे आपण पाहतो. बॉलिवूडमध्ये बरेच गुन्हेगारी विश्वातील चित्रपट आलेले आहेत. ओटीटीमध्ये गुन्हेगारी विश्वातील आशयाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सोबतच एका वेबसीरिजनेही साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ती वेबसीरिज म्हणजे 'मिर्झापूर'. या वेबसीरिजचे पूर्वी दोन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (OTT Webseries)

त्या दोन्हीही सीजनला प्रेक्षकांनी आपला भरघोस प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे 'मिर्झापूर'चा तिसरा सीजनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या सीरिजचे प्री-स्क्रीनिंग करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मिर्झापूर येथील एका रहिवाश्याने याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉन प्राईमवरील 'मिर्झापूर' सीझन ३ वरील बंदी उठवली आहे. या वेबसीरिजची प्री-सेन्सॉरशिप चुकीची असल्याचे कोर्टाचे मत आहे. भारताचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठाने सांगितले की, प्री-सेन्सॉरशिपला परवानगी नाही. वेबसीरिज, चित्रपट किंवा इतर कार्यक्रम थेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कशी काय प्री-स्क्रिनिंग करु शकते, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केला.एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला अधिक चांगली याचिका दाखल करण्यास सांगितले आहे.

अमेझॉन प्राईमची ही वेबसीरिज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित आहे. पंकज त्रिपाठी, कालिन भैय्या, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. आता या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT