Rajkumar Hirani Movie Dunki Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Movie: 'डंकी'चा अर्थ काय आणि का तयार केला हा चित्रपट?, राजकुमार हिरानींनी सांगितली पूर्ण कहाणी

Priya More

What Is Meaning Of Dunki:

दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खान (Shah Rukh Kha) स्टारर बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) गुरुवारी म्हणजे २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू असून यामाध्यमातून चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच दमदार कमाई केली आहे. 'पठान' आणि 'जवान'प्रमाणे डंकीची कथा देखील प्रेक्षकांना आवडावी आणि या चित्रपटाला चांगले यश मिळावे अशी शाहरुख खानला आशा आहे.

सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. शाहरुख खान दुंबईमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. अशामध्ये या डंकीचा नेमका अर्थ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 'डंकी'चा नेमका अर्थ काय आहे? आणि हा चित्रपट कसा तयार झाला याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

डंकी रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी 'डंकी डायरीज' नावाचा व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान, तापसी पन्नू आणि राजकुमार हिरानी या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये राजकुमार हिरानी यांनी डंकी चित्रपट तयार करण्याची कल्पना कुठून आली आणि त्याचा अर्थ काय हे सांगितले आहे. हा व्हिडीओ खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे डंकी चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी प्रेक्षकांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा. जेणे करून त्यांना डंकीचा नेमका अर्थ कळेल.

व्हिडिओमध्ये राजकुमार हिरानी सांगतात की, ते एकदा पंजाबमधील जालंधरला गेले होते. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या घरांच्या छतावर विमानांच्या आणि परदेशी वारशाच्या मूर्ती दिसल्या. हे पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी यासंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना समजले की, जालंधरमधील ज्यांच्या घरातील व्यक्ती विदेशात जातात ते त्यांच्या अभिमानासाठी असे विमान घराच्या छतावर तयार करतात.

राजकुमार हिरानी यांनी असेही सांगितले की, पंजाबचे लोक फक्त गुरुद्वारामध्ये जाऊन परदेशात जाण्यासाठी प्रार्थना करत नाहीत तर शक्य ती प्रत्येक पद्धत अवलंबतात. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर येथील अनेक व्यक्ती परदेशात नोकरीसाठी गेले होते. मात्र नंतर ते बंद करण्यात आले. त्यानंतर लोकांमध्ये फूट पडली. अनेक लोकांचे जवळचे नातेवाईक परदेशात राहिले आणि बरेच जण येथेच राहिले. त्यानंतर इथली लोकं बेकायदेशीर मार्गाने परदेशात जाण्याचा प्रकार सुरू झाला. ते ज्या मार्गाने जात असे त्याला 'डाँकी रूट' असे म्हणतात. याच कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT