‘पठान’ ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर शाहरुखचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ७ सप्टेंबरला शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं ॲटली दिग्दर्शन करत असून चित्रपटाची सर्वत्र तुफान चर्चा होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त चाहतेच नाही तर, इंडस्ट्रितील अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक सुद्धा उत्सुक आहेत. नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी एका दिग्दर्शकांनी शाहरुखचा ‘जवान’ पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे सांगितले.
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही क्षणात चित्रपटाची चर्चा सुरू झाली. ट्रेलरला अवघ्या काही तासात मिलियन्सच्या घरात व्ह्युज मिळाले. दरम्यान, चित्रपटात शाहरुख खान एका बहुरुप्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्याचे अनेक विविध रूपं पाहायला मिळणार आहेत. आणि हे लूक प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगलीच झेप घेतली आहे.
शाहरुख कायमच ‘AskSRK’ च्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी शाहरुखला एका चाहत्याने राजकुमार हिरानींनी ‘जवान’चा ट्रेलर पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले.
यावर शाहरुख म्हणाला, “राजू सरांना ‘जवान’ चा ट्रेलर प्रचंड आवडलाय. ट्रेलर पाहताच मला पहिला मेसेज करणारी व्यक्ती म्हणजे राजू सर. राजू सरांना मी चित्रपटातले काही सीन्स दाखवलेय. त्यांनी कायमच अनेक कामांमध्ये आम्हाला सहकार्य केलंय.” अशा आशयाचं ट्विट सलमानने केलंय.
एकंदरीतच, चित्रपटाच्या तिकीट विक्रीबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे तब्बल २.७१ लाख तिकिटांची विक्री झाली. म्हणजेच, चित्रपटाने प्रदर्शनाआधी एकूण ८.९८ कोटींची कमाई केलीय.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत. चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, सध्या ट्रेलरची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे. (Bollywood)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.