बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. नुकताच शाहरूखच्या ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून दुबईच्या बुर्ज खलिफावर देखील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाबद्दलची उत्सुकता फक्त चाहत्यांनाच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनाही आहे. नुकताच सोशल मीडियावर शाहरूखने चाहत्यांसोबत #AskSRKच्या माध्यमातून संवाद साधलाय. दरम्यान, एका चाहत्याने शाहरूखला सोशल मीडियावर स्पॉयलर विचारला आहे. यावर अभिनेत्याने आपल्या चाहत्याला भन्नाट उत्तर देखील दिलं आहे.
शाहरूख खान कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरूखने नुकताच #AskSRK च्या माध्यमातून संवाद साधलाय. यावेळी शाहरूखच्या चाहत्याने अभिनेत्याला एक स्पॉयलर प्रश्न विचारला आहे. शाहरूखच्या चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की, मी ‘जवान’चं ॲडव्हान्स तिकीट बुक केलंय. तुमचा आगामी चित्रपट मी माझ्या पत्नीसोबत हँगकॉंगमध्ये पाहणार आहे. नक्कीच चित्रपट पाहण्यासाठी आम्ही दोघेही फार उत्सुक आहोत, कृपया चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्हाला एक स्पॉयलर द्या. अशी कमेंट त्याच्या चाहत्याने केली आहे.
यावर शाहरूखने प्रत्युत्तर दिले की, “तुम्ही चित्रपटाची सुरूवात चुकवू नका, वेळेच्या आधीच थिएटरमध्ये पोहोचा.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली आहे. एकंदरीतच खुद्द शाहरूखने चित्रपटाबद्दलच्या स्पॉयलरची एक हिंट दिल्यामुळे नक्कीच चित्रपटाची सुरूवात जबरदस्त असेल यात शंका नाही. ‘गदर २’ च्या सक्सेसपार्टीत शाहरूख आणि सनी पाजी एकत्र दिसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘जवान’ची खूपच उत्सुकता आहे.
एकंदरीतच, चित्रपटाच्या तिकीट विक्रीबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे तब्बल २.७१ लाख तिकिटांची विक्री झाली. म्हणजेच, चित्रपटाने प्रदर्शनाआधी एकूण ८.९८ कोटींची कमाई केलीय.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत. चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, सध्या ट्रेलरची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे. (Bollywood)
सेन्सॉर बोर्डाकडून ‘जवान’ला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ७ महत्त्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली आहे. ‘जवान’ची एकूण वेळ साधारण १६९.१८ मिनिटे आहे. U/A प्रमाणपत्राचा अर्थ असा की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. पण हा चित्रपट १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा चित्रपट पालकांसोबतच पाहणे आवश्यक आहे. सोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास ७ सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.