Shah Rukh Khan Kidnap Alia And Ranbir Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt Video: 'किंग खान'ने 'जवान' स्टाईलमध्ये केलं आलिया आणि रणबीरला किडनॅप, कारण आहे तरी काय?

Shah Rukh Khan Kidnap Alia And Ranbir: शाहरूख खानच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटाने बॉस ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Priya More

Shah Rukh Alia And Ranbir Video:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटचे (Alia Bhatt) एक पोस्टर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होते. या पोस्टरमुळे तिघांच्या देखील चाहत्यांना असे वाटत होते की हे तिघेही प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन घेऊन येणार आहेत.

तसंच एखाद्या नव्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. पण आता या पोस्टरमागचे सत्य समोर आलं आहे. या तिघांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिघेही आपल्या हिट चित्रपटातील लूकमध्ये दिसत आहे.

शाहरूख खानच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटाने बॉस ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून अजूनही प्रेक्षकांमध्ये जवानची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. सध्या शाहरुखच्या जवान चित्रपटातील डायलॉग खूपच फेमस झाले आहेत. आता या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन एक जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख खानसोबत आलिया भट आणि रणबीर कपूर देखील आहेत. ही जाहिरात खूप मजेशीर आहे.

या जाहिरातीत शाहरुख खान त्याच्या जवान चित्रपटातील टक्कल केलेल्या लूकमध्ये दिसत आहे. आलिया भट्ट तिच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या डेब्यू चित्रपटातील शनायाच्या भूमिकेत दिसत आहे. तर रणबीर कपूर 'बर्फी' चित्रपटातील त्याच्या मर्फीच्या लूकमध्ये दिसत आहे. तिघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप जबरदस्त वाटत आहे. शेवटी 'मला एकही डायलॉग नाही दिला गेला' हा रणबीरचा डायलॉगही खूप मजेशीर आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख एका जवानमध्ये दाखवल्याप्रमाणे आलिया आणि रणबीरला मेट्रोमध्ये किडनॅप करतो. शाहरुख खान आलिया आणि रणबीरला त्यांच्या नवीन घराबद्दल विचारतो आणि त्यांनी घरात योग्य काम केले आहे की नाही हे त्यांना विचारताना दिसतो. शाहरुख, आलिया आणि रणबीरच्या या फनी जाहिरातीवर यूजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका युजरने कमेंट्स करत'रणबीर: लास्ट वन इज द बेस्ट.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'रणबीर खूपच क्यूट दिसत आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'तो शिव फक्त एकदाच म्हणाला.'

दरम्यान, शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये कॅमिओमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'टायगर वर्सेस पठाण'मध्येही दिसणार आहे. रणबीरबद्दल बोलायचे झाले तर तो 'अ‍ॅनिमल'मध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. तर आलियाकडे 'जिगरा' आणि 'ब्रह्मास्त्र 2' हे चित्रपट आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT