अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन सध्या ‘बिग बॉस १७’मुळे चर्चेत आले आहेत. अशातच अभिनेत्रीने प्रेग्नंसीच्या चर्चेवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होण्यापूर्वी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेग्नंसीच्या चर्चांवर अंकिता लोखंडे हसत म्हणाली की, “नाही..नाही.. खरचं मी प्रेग्नंट आहे. 'बिग बॉस'च्या घरातच बाळ येणार आहे. या फक्त कल्पना आहेत... मी सहज म्हणाले.”
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अभिनेत्री मुलाखतीत पुढे म्हणाली की, “या अफवा कुठून येतात, मला माहित नाही. मी बऱ्याचदा सोशल मीडियावर माझे बेबी बंप असलेले फोटोशॉप केलेले फोटो पाहते. हे सर्व फोटो कोण एडिट करतं. मला खरंच माहित नाही. पण आम्ही 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर नक्कीच प्रेग्नेंसीचा विचार करणार आहोत. माझा अफवांवर विश्वास नाही. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या अफवा खऱ्या करु.”
तर 'बिग बॉस'च्या घरात सहभागी होण्याआधी विकी जैनने सुद्धा मुलाखत दिली. तो म्हणाला, “मी आणि अंकिता आम्ही दोघेही 'बिग बॉस'चे फार मोठे फॅन आहोत. आम्ही प्रत्येक सीझन पाहिले आहेत. आम्ही दोघे या घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करतो. आम्हाला विचारल्यानंतर एक चांगली संधी म्हणून बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.”
अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करणारी सर्वात महागडी सदस्य असून तिने एका आठवड्यासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेतले आहे. अंकिता आणि विकी जैनने बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याआधी तब्बल २०० आउटफिट्स खरेदी केले.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध मालिकेमध्ये अर्चनाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातूनच अंकिता घराघरात पोहचली. अंकिताने बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. 'मणिकर्क्निका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये तिने कंगना रनौतसोबत काम केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.