Jawan OTT Release Saam TV
मनोरंजन बातम्या

Jawan OTT Release: कोट्यवधी रुपयांना विकले 'जवान'चे राइट्स, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

Jawan Movie News: शाहरुखचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाने जगभरामध्ये ६५० कोटींपार कमाई केली आहे.

Priya More

Jawan Movie Collection:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपट (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने पहिल्या ७ दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही जवानची क्रेझ पाहायला मिळत आहे.

शाहरुखचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटाने जगभरामध्ये ६५० कोटींपार कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशामध्ये या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे राइट्स कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत. शाहरुख खानचा जवान केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली कमाई करत नाही, तर त्याचे ओटीटी हक्कही कोट्यवधी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. त्यानंतर चित्रपटाचा नफा चांगलाच होणार आहे आणि हा चित्रपट बराच काळ चित्रपटगृहात राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने जवानाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्स आणि जवान यांच्यातील करार कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, जवानाचे ओटीटी अधिकार २५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवान प्रदर्शित होणार असला तरी अद्याप त्याची तारीख समोर आली नाही. महत्वाचे म्हणजे नियमानुसार, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४ आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. पण जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर ज्यापद्धतीने कमाई करत त्यामुळे तो ओटीटीवर लवकर रिलीज केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT