Shah Rukh Khan Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Birthday :शाहरुख खानच्या वाढदिवशीच 'मन्नत'बाहेर चाहत्यांच्या मोबाइलची चोरी; पोलिसांकडून तिघांना अटक

Shah Rukh Khan News: शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mobile Stolen Outside Mannat:

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने २ नोव्हेंबरला आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी काही चाहत्यांचे मोबाइल लंपास केले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तीन चोरट्यांना अटक केली आहे.

शुभम जमनाप्रसाद (वय २५), इम्रान महेबूब शेख (वय ३०) आणि मोहम्मद अली खाजा नूर सय्यद (वय २७) यांना करण्यात आली अटक करण्यात आली आहे. यात एक वेटर तर दोन बेरोजगार तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून ९ मोबाईल हस्तगत केले आहेत. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अजूनही २१ चाहत्यांच्या मोबाइलचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शाहरुखच्या ५८ व्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी मन्नात बंगल्याबाहेर मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाईल लंपास केले होते. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख खान आपल्या चाहत्यांसोबत आनंद साजरा करण्यासाठी मन्नत बंगल्यात हजर होतो. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण गर्दी करीत असतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चाहत्यांचे मोबाइल लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, पोलिसांनी या चोरट्यांना आता अटक केली आहे. मागच्या वर्षी देखील या टोळीने मागच्या वर्षी अशाच प्रकारची चोरी केली होती का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात परिमंडळ ९ पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, उपनिरीक्षक गुरुप्रसाद डफळे आणि पथकाने मन्नत बंगल्याभोवती सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT