Lockdown Mode : काय आहे लॉकडाऊन मोड? मोबाइल फोन हॅकिंगपासून वाचण्यासाठी ही सेंटिग ऑन करा, पाहा स्टेप्स

iPhone Lockdown Mode : Apple ने नुकताच नव्या लॉन्चिंगमध्ये iPhoneमध्ये नवी फीचर्स लॉन्च केले आहेत.
Lock Down Mode
Lock Down ModeSaam Tv
Published On

iPhone Update :

Apple ने नुकताच नव्या लॉन्चिंगमध्ये iPhoneमध्ये नवी फीचर्स लॉन्च केले आहेत. त्यात वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी अलर्ट जारी केला आहे. हे टूल स्मार्टफोन हॅकिंगपासून वाचवण्यात मदत करेल.

वापरकर्त्यांना स्मार्टफोनचे (Smartphone) लॉकडाउन मोड चालू करण्यास सांगितले जात आहेत. वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइसचे नवीन सॉफ्टवेअरवर अपडेट करावे आणि पासकोड (Passcode) सेट करावा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे असे सांगण्यात येत आहे.

अ‍ॅपलचे म्हणणे असे आहे की, हे टूल वापरकर्त्यांना हॅकिंगच्या (Hacking) घटनांपासून वाचवण्यास मदत करेल. या संदर्भात अ‍ॅपलने वापरकर्त्यांना नोटिफिकेशन पाठवले आहे. हॅकिंगच्या पीडितांना मदत करण्यासाठी ते अतिरिक्त पावले उचलत असल्याचे सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lock Down Mode
Aadhaar Card Lock : हॅकर्सपासून तुमचा डेटा वाचवण्यासाठी आधार कार्ड करा 'लॉक', कसे? ते जाणून घ्या

काय करावे लागेल?

अ‍ॅपलच्या म्हणण्यानुसार, हॅकिंग टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी प्रथम त्यांचे डिव्हाइस नवीन सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केले पाहिजे.

डिव्हाइसमध्ये पासकोड सेट केला पाहिजे.याशिवाय टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरावे. तसेच अ‍ॅप आयडीसाठी मजबूत पासवर्ड तयार करावा.

अ‍ॅप्स केवळ अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधून डाउनलोड केले जावेत.

प्रत्येक ऑनलाइन खात्यासाठी वेगळा पासवर्ड टाकावा.

कोणत्याही माहिती नसलेल्या किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

यासह, वापरकर्त्यांनी लॉकडाउन मोड सक्रिय करावा.

Lock Down Mode
Diwali Shopping List 2023 : दिवाळीला शॉपिंगचा प्लान करताय? गरजेच्या सामानाची यादी बनवताना या स्मार्ट शॉपिंग टिप्स लक्षात ठेवा

लॉकडाउन मोड म्हणजे काय?

अ‍ॅपलच्या नवीनतम सॉफ्टवेअर अपडेटमध्ये लॉकडाउन मोड प्रदान करण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना स्पायवेअर आणि हॅकिंगपासून संरक्षण देतो. लॉकडाउन मोड iOS 16, iPad OS16, MacOS व्हेंचर आणि नंतरसाठी आणला गेला आहे.

Lock Down Mode
Flipkart Big Diwali Sale : खुशखबर! दिवाळीत या घरगुती वस्तूंवर 70 टक्के पर्यंतची सूट; 299 रुपयांपासून खरेदीला सुरूवात

लॉकडाउन मोड कसा चालू करावा?

  • अ‍ॅपलच्या iPhoneमध्ये सर्वात आधी सेटिंग्जमध्ये जा.

  • Search Barवर Lockdown Mode सर्च करा.

  • यानंतर Turn On Lockdown Modeवर क्लिक करा.

  • यानंतर Turn On And Restartवर क्लिक करा.

  • त्यानंतर एक कोड येईल, तेथे तुमच्या मोबाईल कोड टाका.

  • तुमचा मोबाईल रिस्टार्ट होईल. आणि हा मोड चालू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com