Singham Again BTS Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singham Again: स्फोट, उडती कार...अशी आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची पहिली झलक, BTS Video व्हायरल

Singham Again BTS Video: रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटलं तर जबरदस्त अ‍ॅक्शन उडत्या कार, स्फोट आणि भरपूर ड्रामा पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्याचे चित्रपट पाहायला आवडतात. आता त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priya More

Singham Again Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटलं तर जबरदस्त अ‍ॅक्शन उडत्या कार, स्फोट आणि भरपूर ड्रामा पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्याचे चित्रपट पाहायला आवडतात. आता त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सेध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अशामध्ये रोहित शेट्टीने मकर संक्रांतीच्या दिवशी चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे.

'सिंघम अगेन' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रोहित शेट्टीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने चाहत्यांना खास सरप्राइज दिले आहे. रोहित शेट्टीने अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'सिंघम अगेन' च्या सेटवरील बीटीएस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'सिंघम अगेन' हा बीटीएस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहित शेट्टी मूव्हीजने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना 'सिंघम अगेन'च्या सेटवरील एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शेट्टीच्या आवाजात अॅक्शन ऐकू येते. त्यानंतर एक काळी कार पुढे जाऊ लागते आणि त्यानंतर स्फोट होतो. त्यानंतर जळणारी ही कार हवेत उडते. या व्हिडीओमध्ये आपल्याला रोहित शेट्टी देखील दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे.

'सिंघम अगेन'च्या या बीटीएस व्हिडिओपेक्षा रोहित शेट्टीने इन्स्टाग्राम पोस्ट करताना दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रोहित शेट्टीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की,'मकर संक्रांतीच्या शुभेच्छा... तुम्ही लोकं पतंग उडवा आणि मला माझे काम... अॅक्शन... रात्रीचे शूट... हैदराबाद.'

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची म्हणजे 'सिंघम अगेन' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कॉप युनिव्हर्स फ्रँचायझी चित्रपटाचे शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगणसोबत अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. रोहित शेट्टीचा हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT