Riteish Deshmukh Enter In Raid 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raid 2 Movie: अजय देवगणच्या 'रेड 2'मध्ये रितेश देशमुखची एन्ट्री, चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार अभिनेता?

Riteish Deshmukh Enter In Raid 2: 'रेड 2'च्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटातील विलनच्या नावाची घोषणा केली. रितेश देशमुख या चित्रपटामध्ये विलनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रितेशची एन्ट्री झाल्यामुळे त्याचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

Priya More

Raid 2 Actor Ajay Devgan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) 'रेड 2' या चित्रपटामुळे (Raid 2 Movie) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटामधील एका-एका कलाकारांची नावं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामध्ये वाणी कपूर दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली. आधीच्या 'रेड' चित्रपटामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत होती. पण 'रेड 2' मध्ये तिची जागा वाणीने घेतली. आता या चित्रपटामध्ये आणखी एका सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे. 'रेड 2'मध्ये अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) विलनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

'रेड 2'च्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटातील विलनच्या नावाची घोषणा केली. रितेश देशमुख या चित्रपटामध्ये विलनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रितेशची एन्ट्री झाल्यामुळे त्याचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यामध्ये टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आयआरएस ऑफिसर अमय पटनायकची भूमिका साकारणार आहे. आता त्याचे लक्ष्य रितेश देशमुख असणार असल्याचे दिसून येत आहे. रितेश देशमुख देखील या चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

'रेड 2' देखील टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार केला जात आहे. या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट शेअर करत रितेश देशमुख विलनच्या भूमिकेत सहभागी झाल्याची माहिती दिली. रितेश देशमुखसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, 'समोरा समोर येण्यासाठी सज्ज राहा! रेड 2 मध्ये रितेश देशमुख प्रतिस्पर्ध्याची भूमिका साकारत आहे. रितेश देशमुखचे स्वागत आहे.' या फोटोंमध्ये रितेश देशमुख हा अजय देवगण, रवी तेजा, वाणी कपूर आणि 'रेड 2'च्या टीमसोबत दिसत आहे. रितेशचे चाहते या फोटोंवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत. 'रेड 2' चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुख पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर अजय देवगण विरुद्ध दिसणार आहे. या चित्रपटात दोघांमध्ये टक्कर होणार आहे.

दरम्यान, अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाचे शूटिंग 6 जानेवारीपासून सुरू झाले आहे. चित्रपटाचे सुरूवातीचे शूटिंग मुंबईत होणार असून त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांचे शूटिंग होणार आहे. राजकुमार गुप्ता अजय देवगणचा 'रेड 2' चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. राजकुमार गुप्ता यांनीच या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होते. 'रेड 2' चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी टी-सीरीजच्या सहकार्याने केली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

SCROLL FOR NEXT