Ranveer -Deepika Showered Love SRK Children Saam TV
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Video: रणवीर-दीपिकाला भेटायला आली 'किंग खान'ची मुलं, व्हिडीओची होतेय चर्चा

Ranveer -Deepika Showered Love SRK Children: रणवीर आणि दीपिकाला भेटण्यासाठी किंग खानची म्हणजेच शाहरुख खानची मुलं आली होती.

Priya More

Ranveer Singh And Deepika Padukone:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी वर्ल्डकप २०२३ चा (World Cup 2023) अंतिम सामना टीम इंडिया विरूद्ध टीम ऑस्ट्रेलियामध्ये (Team India Vs Team Australia) पार पडला. या सामन्यामध्ये टीम ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला आणि सहाव्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.

हा सामना पाहण्यासाठी आणि टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडचे स्टार कपल अर्थात अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) हजेरी लावली होती. या कपलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यावेळी रणवीर आणि दीपिकाला भेटण्यासाठी किंग खानची म्हणजेच शाहरुख खानची मुलं आली होती. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

वर्ल्डकपमधील टीम इंडिया विरूद्ध टीम ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती. बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान हा आपल्या कुटुंबासोबत याठिकाणी आला होता. यावेळी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना पाहून शाहरूख खानची मुलगी सुहाना आणि अबराम त्यांच्याकडे आले. यावेळी दीपिका आणि रणवीरने या दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांचा हा क्युट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

रणवीर सिंगने आधी अबरामच्या कपाळावर किस केले. त्यानंतर त्याने सुहानाची गळाभेट घेत तिच्या गालावर देखील किस केले. शाहरूखच्या मुलांना पाहून दीपिका देखील खूपच खूश झाली. तिने अबरामच्या गालावर किस केले आणि सुहानाला देखील मिठी मारत किस केले. या कपलने अबराम आणि सुहानाचे खूप लाड केले. त्यानंतर रणवीरने शाहरुख खानची भेट घेतली आणि त्याला मिठी मारत विचारपूस केली.

दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांची मैत्री खूपच खास आहे. त्यामुळे तिचे खान कुटुंबीयांशी देखील खूपच चांगले संबंध आहेत. दरम्यान, दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या दीपिका तिच्या आगामी 'फाइटर' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'फायटर' हा देशातील पहिला एरियल अॅक्शन ड्रामा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT