Ramayana Set Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana: 'रामायण' चित्रपटाच्या 11 कोटींच्या भव्य सेटची झलक आली समोर, VIDEO व्हायरल

Ramayana Movie: रामायण चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. अशामध्ये आता या चित्रपटाच्या भव्य सेटचा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Ramayana Set Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर अपकमिंग चित्रपट 'रामायण'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये एकापाठोपाठ एका स्टार्सची एन्ट्री झाली आणि त्यांची नावं देखील समोर आली. आता या चित्रपटाबाबतचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. अशामध्ये आता या चित्रपटाच्या भव्य सेटचा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचा भव्य आणि सुंदर सेट पाहायला मिळतो. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'रामायण' चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा कोणत्याही स्टारच्या एन्ट्रीची नसून एका व्हिडिओची आहे. जो रणबीर कपूरच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा व्हिडिओ दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये चित्रपटाचा भलामोठा सेट दिसत आहे. सेटवर कामगार काम करताना दिसत आहे. रणबीर कपूरच्या 'रामायण' या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी जोरात सुरू आहे. सेटवरून समोर आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. रामायण चित्रपटाच्या या शानदार सेटसाठी 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

रणबीर कपूरशिवाय सनी देओल, बॉबी देओल, साऊथ सुपरस्टार यश, विजय सेतुपती यांच्यासह अनेक मोठे स्टार्स चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अनेक टीव्ही स्टार्सचीही एन्ट्री होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये रवी दुबे, कैकयीच्या भूमिकेमध्ये लारा दत्ता, श्रुपनखाच्या भूमिकेमध्ये रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभू रामाचे भाऊ भरतच्या भूमिकेमध्ये कोण दिसणार यावर चर्चा सुरू होती. अशामध्ये आता भरत हे पात्र मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना आर्ची , ना रिंकू; खरं नाव ऐकून थक्क व्हाल

Reem Shaikh: जेन झी मुलींनी अट्रॅक्टिव्ह लूकसाठी रीम शेखला नक्की करा कॉपी

Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, नाराजी उफाळली; सहसंपर्कप्रमुखपद नको म्हणत जिल्हाप्रमुखानं थेट राजीनामा पाठवला

Shashikant Shinde : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

Maharashtra Live News Update: - आदिवासी विकास भावनासमोर बसलेले आदिवासी आंदोलन आक्रमक

SCROLL FOR NEXT