बॉलिवूडचे (Bollywood) दिवंगत अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा आज जन्मदिवस आहे. राजेश खन्ना आज आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये ते आजही जिवंत आहेत. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये अमृतसर येथे झाला होता. राजेश खन्ना यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. महत्वाचे म्हणजे बॉलिवूडला १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार होते.
राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ या कालावाधीमध्ये लागोपाठ ७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यामुळे त्यांना हिंदी सिनेसृ्ष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले जात होते. राजेश खन्ना त्यांच्या फिल्मी करिअरसोबत लव्हलाइफमुळे नेहमी चर्चेत राहिले. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी (rajesh khanna and dimple kapadia love story) होती. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेणार आहोत...
फार कमी लोकांना माहिती आहे की, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची भेट चित्रपटपटामध्ये काम करण्यापूर्वी झाली होती. या दोघांची भेट अहमदाबाद येथील नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. ७० च्या दशकामध्ये राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये चीफ गेस्ट होते. त्या ठिकाणी राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाला पाहिले आणि ते तिच्या प्रेमात पडले. त्यांना डिंपल कपाडिया प्रचंड आवडत होती. या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरूवात इथूनच झाली. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी १९७३ साली लग्न केले. राजेश खन्ना त्यावेळी डिंपल कपाडिया यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते.
लग्नानंतर डिंपल कपाडिया ११ वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. त्याचदरम्यान ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींचा जन्म झाला. डिंपल कपाडिया यांना चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा होती. पण राजेश खन्ना हे या निर्णयाविरोधात होते. याच कारणांमुळे या कपलच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला. यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. याचदरम्यान राजेश खन्ना यांचे नाव टीना मुनीम यांच्यासोबत जोडले गेले. त्याचवेळी त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
राजेश खन्ना यांची बायोग्राफी 'Rajesh Khanna: The Untold Story Of Indias First Superstar' मध्ये दिल्याप्रमाणे, राजेश खन्ना आणि टीना मुनीम रिलेशनशीपमध्ये आल्यामुळेच राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. त्यावेळी राजेश खन्ना हे टीना मुनीमसोबत एका चित्रपटामध्ये काम करत होते. या चित्रपटाची शूटिंग मॉरिशसमध्ये सुरू होती. शूटिंगसाठी डिंपल कपाडिया देखील राजेश खन्ना यांच्यासोबत गेल्या होत्या.
मॉरिशसमध्ये राजेश खन्ना आणि टीना मुनीम यांची जवळीक पाहून डिंपल कापडिया यांना राग आला. त्या ताबडतोब तिथून निघून भारतामध्ये आल्या. भारतामध्ये परत आल्यानंतर त्या आपल्या वडिलांच्या घरी निघून गेल्या. त्यानंतर त्या राजेश खन्ना यांच्या घरी परत कधीच आल्या नाही. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघे वेगळे झाले होते.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले होते पण या दोघांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. १९९० मध्ये राजेश खन्ना यांनी आयटीएमबीला मुलाखत दिली होती. या शोमध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, डिंपल कपाडिया आणि तुम्ही परत एकत्र येणार आहात का? यावर उत्तर देताना राजेश खन्ना यांनी सांगितले होते की, 'परत म्हणजे काय...आधी कुठे होते. आम्ही वेगळे राहतो. पण आमचा घटस्फोट झाला नाही. कारण ती घटस्फोट देत नाही आणि ती घटस्फोट का नाही देत हे तुम्ही तिलाच विचारा. कारण याचे योग्य उत्तर तीच देऊ शकते. मी हे सांगेल की ही मनाची गोष्ट आहे.'
तर या पुस्तकानुसार डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांना घटस्फोट घ्यायचा होता पण अभिनेत्रीने त्यावेळी अट ठेवली होती की त्यांच्या दोन्ही मुलींच्या आर्थिक संरक्षणावर लक्ष दिले पाहिजे. राजेश खन्ना हे डिंपल कपाडियांच्या या मागणीला टाळत होते. यामुळेच डिंपल घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास नकार देत होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.