Tv Celebrity On Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Alive: कलयुगमध्ये आपले स्वागत..., अली गोनीपासून ते आरती सिंहपर्यंत पूनम पांडेवर टीव्ही सेलिब्रिटींनी व्यक्त केला राग

Tv Celebrity On Poonam Pandey: पूनम पांडेच्या या वागण्यामुळे सर्वजण तिच्यावर राग व्यक्त करत आहेत. टीव्ही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम पांडेच्या या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

Priya More

Poonam Pandey Death Fake News:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडेला (Poonam Pandey) निधनाची खोटी बातमी पसरवणे चांगलेच महागात पडले आहे. पूनम पांडेने गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता तिने व्हिडीओ पोस्ट करत जिवंत असल्याचे सांगितले आहे. पूनम पांडेच्या या वागण्यामुळे सर्वजण तिच्यावर राग व्यक्त करत आहेत. टीव्ही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम पांडेच्या या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री आरती सिंहनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पूनम पांडेवर राग व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, 'घृणास्पद, ही जागरूकता नाही. माझा जन्म झाला तेव्हा कॅन्सरमुळे मी माझी आई गमावली. कॅन्सरमुळे मी माझे वडील गमावले… माझी आई डॉक्टरांना सांगायची की मला वाचवा. माझ्या मुलीचा आताच जन्म झाला आहे आणि माझा एका वर्षाचा मुलगा आहे. तू जनजागृती करत नाही तर खोटं पसरवत आहेस.'

पूनम पांडेच्या या कृत्यानंतर अभिनेता शार्दुल पंडितनेही एक व्हिडिओ पोस्ट करून राग व्यक्त केला आहे. त्याने सांगितले की, 'हे योग्य नाही पूनम पांडे, कोणीही ही विचारसरणी घेऊन आला नाही. ज्याने तुम्हाला सांत्वन दिले ते चांगले नाही. ज्याने पण हा विचार केला की ही चांगली जनजागृती आहे. मला हे खूप वाईट वाटले. तू जिवंत आहेस याबद्दल मी देवाचे जितके आभार मानतो, तितकेच मला या गोष्टीचा तिरस्कार वाटतो की मला आणि अनेकांना दु:खद भावना, वेदना आणि दुःखातून जावे लागले. ते घडले म्हणून मी सोशल मीडियावर सांगत आहे. हे थांबवण्याची गरज आहे. कॅन्सरमुळे मी माझी आई गमावली आहे, मी नैराश्याबद्दल बोलतो. आता असे स्टंटबाजी थांबवण्यासाठी मी जाहीरपणे बोलतो. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, मग ही जाणीव कशी होणार?'

बिग बॉस फेम अली गोनीने लिहिले की, 'हा एक स्वस्त पब्लिसिटी स्टंट होता. तुला हा जोक वाटतो का? तुमचा आणि तुमच्या पीआर टीमवर बहिष्कार टाकला पाहिजे. वाईट लोकांनो सर्व मीडिया पोर्टल, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्हासर्वांना लाज वाटते.' तर बिग बॉस फेन राहुल वैद्यने यापूर्वीच पूनम पांडे जिवंत असल्याचा दावा केला होता. आता हा दावा खरा ठरल्याने त्याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की- 'आणि मी बरोबर होतो!! आता पूनम जिवंत आहे म्हणून मी आरआयपी पीआर/मार्केटिंग म्हणू शकतो. खळबळजनक/व्हायरल मोहिमा तयार करण्याचा एक नवीन स्तर... कलयुगमध्ये आपले स्वागत आहे.'

अभिनेत्री निक्की तांबोळीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट करत पूनम पांडेवर राग व्यक्त केला आहे. तिने लिहिले की, 'एकदम घृणास्पद! काही लोक फक्त क्षणभर लक्ष वेधून घेण्यसाठी असे करतात हे निराशाजनक आहे. एखाद्याच्या मृत्यूचे, विशेषत: कर्करोगासारख्या गंभीर आजाराबद्दल नाटक करणे, हे अत्यंत अपमानास्पद आहे. हे खूप वाईट आहे. जगभरातील कोट्यवधी लोकं सध्या या आजारासोबत संघर्ष करत आहेत. त्या लोकांचा विश्वास तोडतात ही अशी लोकं जे खरंच याची कदर करत नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT