Manushi Chhillar Instagram/@manushi_chhillar
मनोरंजन बातम्या

Manushi Chhillar: मानुषी छिल्लरची 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये एन्ट्री, उद्या होणार टीझर लाँच

Manushi Chhillar Movie: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामध्ये (Bade Miyan Chote Miyan Movie) मानुषी छिल्लरची एन्ट्री झाली आहे.

Priya More

Bade Miyan Chote Miyan Movie:

2017 मध्ये मिस वर्ल्डचा (Miss World) किताब जिंकणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या चर्चेत आली आहे. अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मानुषी छिल्लर 2024 मध्ये नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shrof) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामध्ये (Bade Miyan Chote Miyan Movie) मानुषी छिल्लरची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये मानुषी देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे गेल्या वर्षी ती या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या फक्त चर्चा होत्या. आता मात्र कन्फर्म झाले असून याबाबत घोषणा करण्यात आली आह.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 24 जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार असून या बड्या कलाकारांसोबत आता मानुषीसुद्धा आपल्याला मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.

मानुषी छिल्लर सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती सध्या सगळ्या कलाकारांसह जॉर्डनमध्ये शूट करत आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत या चित्रपटची टीम तीन गाण्याचे शूट करणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात ती नेमकी काय भूमिका साकारणार आहे हे निर्मात्यांनी अद्याप सांगितलं नाही. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात हॅकरची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमारसोबत तिचं काम हे तिच्या कामाची अनोखी बाजू दाखवणार आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे शूटिंग यूएई आणि युरोपमध्ये करण्यात येत आहे. दरम्यान, मानुषी 16 फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या तेलुगू स्टार वरुण तेजसोबत तिचा द्विभाषिक चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'मध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT