Saiee Manjrekar And Mahesh Manjrekar Saam TV
मनोरंजन बातम्या

Saiee Manjrekar: सई मांजरेकरची उंच भरारी, वडिलांसोबत एकाच बिल्डिंगमध्येच खरेदी केलं आलिशान घर

Saiee Manjrekar Buy House: बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग ३' (Dabang 3 Movie) चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सई ताम्हणकर लवकरच 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Saiee Manjrekar House:

बॉलिवूड (Bollywood) आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सध्या चर्चेत आहे. वडिलांच्या पायावर पाय ठेवत सई देखील सिनेसृष्टीमध्ये आपले नशीब आजमावत आहे. बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग ३' (Dabang 3 Movie) चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सई ताम्हणकर लवकरच 'कुछ खट्टा हो जाए' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सईसोबत गुरू रंधावा मुख्य भूमिकेत आहे. सध्या सई या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

नुकताच सईने नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी सईला 'मुलगी असण्याचा सगळ्यात जास्त अभिमान केव्हा वाटला? त्याचसोबत मुलगी असल्यामुळे कधी हिनवलं गेलं का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सईने सांगितले की, 'अलीकडे जेव्हा मी आणि पप्पा यांनी एका बिल्डिंगमध्ये घर घेतले. तेव्हा मला खूप अभिमान वाटला. मी ते करू शकले याचा मला आनंद आहे. मला माझ्या आई-पप्पांसाठी खूप काही करायचे आहे. मला एक दिवस आई आणि पप्पांना म्हणायचे आहे की आता खूप काम केलं. तुम्हाला आता आरामाची आवश्यकता आहे. मी त्यांना ती सुविधा देऊ शकते त्या उंचीवर मला पोहोचायचे आहे.'

मुलगी असल्यामुळे कधी हिनवलं गेलं का? या प्रश्नाचे उत्तर देताना सईने सांगितले की, 'खरे सांगायचे झाले तर अनेक वेळा अपमान थेट केल जात नाही. हे अत्यंत सूक्ष्मरितीने घडते आणि काहीवेळा ते त्यावेळी जाणवतही नाही. नंतर जेव्हा तुम्ही बसून विचार करता तेव्हा तुम्हाला असे वाटते की हा बदल माझ्यात झाला कारण मी मुलगी आहे. कित्येकदा तुम्हाला हिनतेची जाणीव करून देण्याची इतकी सवय होऊन जाते की तुम्हाला ते सामान्य वाटू लागते.'

दरम्यान, सई मांजरेकर आणि गुरु रंधावा यांचा रोम-कॉम 'कुछ खट्टा हो जाए' जो आग्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा दोन प्रेमी आणि त्यांच्या वेड्या कुटुंबांभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरसह त्याच्या पहिल्या लूकला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. दोन्ह लव्हबर्डच कसे लग्न करतात आणि नंतर त्यांचे आयुष्य वेडेपणाने भरून जाते. पण सई गरोदर राहिल्यानंतर परिस्थिती बदलते हे चित्रपटाच्या ट्रेलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक सध्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT