Sara Ali Khan And Kartik Aaryan Saam Tv
मनोरंजन बातम्या

'प्रत्येकाने आपल्या नात्याचा आदर केला पाहिजे', ब्रेकअपबद्दल बोलल्यामुळे Sara Ali Khan वर नाराज झाला Kartik Aaryan

Sara Ali Khan On Breakup With Kartik Aaryan: कॉफी विथ करणमध्ये सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबत झालेल्या ब्रेकअपवर देखील खुलेपणाने सांगितले होते.

Priya More

Kofee With Karan 8:

करण जोहरचा (Karan Johar) प्रसिद्ध रियालिटी शो 'कॉफी विथ करण ८' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये नुकताच अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Kha) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांनी हजेरी लावली. करण जोहरसोबत गप्पा मारताना या शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या पर्सनल लाइफ आणि रिलेशनशिपबद्दल उघडपणे भाष्य केले. यावेळी सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबत झालेल्या ब्रेकअपवर देखील खुलेपणाने सांगितले होते. यामुळे सारा अली खान चर्चेत आली होती. पण आता साराच्या याच वागण्यामुळे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) नाराज झाला आहे.

कॉफी विथ करण 8 मध्ये करण जोहरने सारा अली खानला विचारले होते की, एक्स कार्तिक आर्यनशी मैत्री करणं सोपं होतं का? यावर साराने स्पष्टपणे सांगितले होते की, 'हे नेहमीच सोपे नसते.' अशामध्ये आता फिल्म कंपेनियनच्या अनुपमा चोप्रा यांच्याशी संवाद साधताना कार्तिक आर्यनने सारा अली खानच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकने सांगितले की, 'मला एक गोष्ट वाटते की दोन व्यक्तींमध्ये नाते असेल तर समोरच्या व्यक्तीनेही त्या गोष्टी बोलू नयेत. आपण सर्वांनी आपल्या नात्याचा आदर केला पाहिजे.'

कार्तिकने पुढे सांगतले की, 'मी कधीही कोणाशीही आपल्या नात्याबद्दल बोललो नाही. मी माझ्या पार्टनरकडूनही अशीच अपेक्षा करतो. नात्याबद्दल बोलणे कुणालाही शोभत नाही. जर गोष्टी घडत नसतील तर... पण तुम्ही एकत्र असाल तेव्हा अशी अपेक्षा नाही. हे संपेल अशी तुम्ही कल्पना करू नका. मला वाटतं तुम्ही त्या वेळेचा, त्या क्षणाचा आदर केला पाहिजे. मला वाटतं तुम्ही स्वतःचाही आदर केला पाहिजे. तुम्ही बोलता तेव्हा समोरची व्यक्ती फक्त एकाच व्यक्तीबद्दल विचार करत असते असे नाही, तो त्या दोघांचा विचार करत असतो.'

दरम्यान, कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. कार्तिक आर्यनकडे सध्या अनेक प्रोजेक्ट हातामध्ये आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तो नेहमी आपल्या नवीन प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT