Kangana Ranaut Saam Digital
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौतला खरंच देशाचं पंतप्रधान व्हायचंय?, म्हणाली - 'मी तर फक्त...'

Kangana Ranaut Emergency Movie: कंगना रनौत तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना रनौत व्यतिरिक्त अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे यासारखे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Kangana Ranaut Movie:

बॉलिवूडची (Bollywood) 'धाकड गर्ल' अर्थात अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'एर्मजन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना रनौतने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे. नुकताच मुंबईमध्ये कंगना 'रझाकार: द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद' या तेलुगू चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सहभागी झाली होती.

या कार्यक्रमात तिने भारताची पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली. तिला देशाची पंतप्रधान होण्याचा विचार केला आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कंगनाने अतिशय मजशीर उत्तर दिले. कंगनाने सांगितले की, 'मी नुकताच 'इमर्जन्सी' नावाचा चित्रपट केला आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतर मी पंतप्रधान म्हणून कोणालाच नको असेल.' कंगना रनौतनेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंगना रनौतने राजकारणात येण्याबद्दलच्या तिच्या भावना शेअर केल्या होत्या. त्यावेळी तिने मी खरंच एक राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले होते. कंगनाने ट्विटरवर म्हटलं होतं की, 'मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. मी राजकीय व्यक्ती नाही. मला अनेकवेळा राजकारणात येण्यास सांगितले गेले. पण मी तसे केले नाही.' कंगना रनौतने नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी पत्रकारांनी निवडणुकीबाबत तिला प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना तिने सांगितले होते की, 'श्रीकृष्णाची कृपा राहिल्यास निवडणूक लढवेन.'

आता कंगना रनौत तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना रनौत व्यतिरिक्त अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे यासारखे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना रनौतने शनिवारी सत्यनारायण यांच्या 'रझाकार: द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळी तिने स्वतःला सरदार वल्लभभाई पटेल यांची मोठी प्रशंसक म्हणून वर्णन केले. ज्यांच्या निर्णायक कृतीमुळे सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबादचे विलीनीकरण झाले.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चच्या अनेक झलक शेअर केल्या आहेत. तिने या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंकही शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिले की, 'हा आहे 'रझाकार' चित्रपटाचा ट्रेलर, तो बघा, खूप प्रभावी आहे. मी सरदार वल्लभभाई पटेल यांची मोठी प्रशंसक आहे. मी मुंबई येथे मीडियासाठी ट्रेलरचे अनावरण करण्याचे स्वीकारले. मला आमंत्रित केल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT