Jawan Box Office Collection Day 2 Saam tv
मनोरंजन बातम्या

Jawan Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर 'जवान'चा धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

Shah Rukh Khan Jawan Movie: दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर जवान सुपरफास्ट असल्याचे पाहायला मिळाले.

Priya More

Jawan Movie Collection:

बॉलिवूडच्या (Bollywood) 'किंग खान' अर्थात शाहरुख खानच्या (Actor Shah Rukh Khan) 'जवान'ची (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने दमदार ओपनिंग करत बॉलिवूडमध्ये पहिल्याच दिवशी सर्वात जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर जवान सुपरफास्ट असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

शाहरुखच्या जवानची त्याच्या चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे याचा अंदाज चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी सर्वांना आला. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'जवान'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकट्या भारतामध्ये ७५ कोटी रुपयांची ओपनिंग केली. तर संपूर्ण जगभरामध्ये या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १२० कोटींची कमाई केली. आता चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. जे पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमी आहे. १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केलेल्या जवानने दुसऱ्या दिवशी ५० कोटींच्या वर कमाई केली आहे.

SACNILC च्या अहवालानुसार, जवान चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पहिल्या दिवशी ७५ कोटींचा गल्ला जमवून हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. चित्रपटाचे एकूण कलेक्शन १२७.५० कोटी झाले आहे. मात्र, वीकेंडला हा चित्रपट आणखी जादू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कलेक्शन वाढणार आहे. शुक्रवारी सुट्टी नसल्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला. आता शनिवार आणि रविवारी हा चित्रपट पुन्हा रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज आहे.

शाहरुख खानचा जवान चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला आहे. या चित्रपटाबाबत समिक्षकांनी देखील चांगले मत मांडले आहे. त्याचसोबत शाहरुख खानचे चाहते याला खूपच चांगला प्रतिसाद देत आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण , सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख आणि नयनतारा यांनी पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. या जोडीलाही प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

SCROLL FOR NEXT