बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरने अगदी कमी वर्षात चांगले यश मिळवले आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.जान्हवीच्या कोणत्याही चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी देखील ती नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते. जान्हवी कपूर आता बॉलिवूडनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.
लवकरच ती 'देवरा' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी साऊथ सुपरस्टार कपूर ज्युनिअर एनटीआरसोबत काम करणार आहे. या चित्रपटामध्ये काम करता करता जान्हवीच्या हाती आणखी एक साऊथ चित्रपट लागला आहे. जान्हवीने आता आपल्या मानधनामध्ये देखील वाढ केली आहे.
जान्हवी कपूरच्या देवरा चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी कपूर तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अशामध्ये नुकतीच घोषणा करण्यात आली की, जान्हवी कपूरला राम चरणच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बुची बाबू सना विरुद्ध कास्ट करण्यात आले आहे. जान्हवीच्या हाती दुसरा साऊथ चित्रपट येताच तिने आपल्या फीमध्ये वाढ केल्याची बातमीही समोर आली आहे.
राम चरणच्या आगामी 'आरसी 16' या चित्रपटात जान्हवी कपूरची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या ताज्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटांसाठी तिची फी वाढवली आहे. जान्हवी कपूरने ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा' या चित्रपटातील भूमिकेसाठी 5 कोटी रुपयांचे मानधन मागितले होते.
डेक्कन क्रॉनिकलच्या नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, जान्हवीने तिची फी वाढवली आहे आणि आता या प्रोजेक्टसाठी तिने 10 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, जान्हवी कपूर राम चरणच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 6 कोटींचे मानधन घेऊ शकते.
विशेष म्हणजे, जान्हवी कपूरच्या दोन्हीही 'आरआरआर' चित्रपटाचे स्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता ती आता साऊथ चित्रपटातून छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. जान्हवीचे चाहते तिच्या य दोन्ही चित्रपटांसाठी खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.