nupur shikhare reveals why he went running 8 kms Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nupur Shikhare: लग्नाच्या ठिकाणी जीम सूटवर ८ किलोमीटर का धावला?; आयरा खानचा पती नुपूर शिखरेनं सांगितलं भावनिक कारण

Nupur Shikhare Video: मुंबईत रजिस्टर मॅरेज करताना नुपूर शिखरे लग्नाच्या ठिकाणापर्यंत जिम सूटवर धावत आला होता. आता लग्नांतर आयराचा नवरा नुपूर शिखरेने असं का केलं यामागचे कारण सांगितले आहे.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर 'परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खानने (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) नुकताच लग्नगाठ बांधली. आयरा आणि नुपूरच्या लग्नाची खूपच चर्चा झाली. मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर उदयपूरमध्ये या कपलने ग्रँड वेडिंग केले. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत रजिस्टर मॅरेज करताना नुपूर शिखरे लग्नाच्या ठिकाणापर्यंत जिम सूटवर धावत आला होता. आता लग्नांतर आयराचा नवरा नुपूर शिखरेने असं का केलं यामागचे कारण सांगितले आहे.

3 जानेवारीला आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईमध्ये हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले. नुपूर त्याच्या घरापासून ते या हॉटेलपर्यंत तब्बल 8 किलोमीटरपर्यंत कारने आला नाही. तर तो लग्नाच्या ठिकाणी धावत धावत आला. शॉर्ट्स, बनियान आणि स्पोर्टशूट असा जिम सूट घालून नुपूर लग्नाच्या ठिकाणी पोहचला होता. त्याला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्नाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर नुपूर ढोल वाजवून मित्रांसोबत नाचला. नुपूरने असं का केलं, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता यामागचे कारण व्हिडीओच्या माध्यमातून स्वत: नुपूरने सांगितले आहे.

आयरासोबत रजिस्टर मॅरेज करण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ इथल्या घरापासून ते वांद्रे येथील लग्नाचे ठिकाण असलेल्या हॉटेल ताज लँड्स एंडपर्यंत नुपूर पळत पळत आला होता. लग्नाची मिरवणूकही याच पद्धतीने पोहोचली. नुपूरसोबत त्याचे काही मित्र देखील धावत येत होते. आता वेडिंग प्लॅनरने आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नूपुरने सांगितले की, माझ्या घरापासून आयराच्या घरापर्यंत मी धावायचो. ज्या मार्गाने मी विवाहस्थळी पोहोचलो त्या मार्गाशी माझं खूप खास आणि भावनिक संबंध आहे.'

दरम्यान, आयरा खान आणि नुपूर शिखरे कोर्ट मॅरेजच्या वेळी खूपच सुंदर दिसत होते. आयराने लाइट पिंक कलरचा शरारा परिधान केला होता. नववधू्च्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. या कपलचा लग्नातला लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर कमेंट्स करत दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपूर वरून परत ठेऊन संत गजानन महाराज यांची पालखी शेवटच्या टप्प्यात पोहोचली

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

SCROLL FOR NEXT