Ira Khan-Nupur Shikhare Wedding Saam TV
मनोरंजन बातम्या

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: ना हिंदू, ना मुस्लिम 'या' पद्धतीने आयरा-नुपूरने केलं लग्न, व्हेडिंग VIDEO व्हायरल होताच झाले ट्रोल

Ira -Nupur Wedding Video: ना हिंदू, ना मुस्लिम तर ख्रिश्चन पद्धतीने या कपलने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता लग्नाच्या पद्धतीवरून आयरा खानला ट्रोल केले जात आहे.

Priya More

Ira Khan Wedding Video:

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) अखेर विवाहबंधनात अडकली. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा (Ira Khan-Nupur Shikhare Wedding) पार पडला. 3 जानेवारीला मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज केल्यानंतर 10 जानेवारीला या कपलने उदयपूरमध्ये धुमधडाक्यात लग्न केले.

गेल्या 3 दिवसांपासून आयरा आणि इराचे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणीच राहिले. आयरा आणि नुपूरचे महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न होणार असल्याचे बोलले जात होते. पण ना हिंदू, ना मुस्लिम तर ख्रिश्चन पद्धतीने या कपलने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे वेडिंग फंक्शन तीन दिवस चालले. या वेडिंग फंक्शनमध्ये दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारांनी खूप धम्माल केली. मेहंदी, संगीत सिरेमनीनंतर 10 जानेवारीला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचीच चर्चा होती. अखेर त्यांचे लग्न झाले असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या कपलने लग्नानंतर खूपच सुंदर डान्स केला.

आयरा आणि नुपूर यांचा 3 जानेवारी रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये नोंदणीकृत विवाह झाला होता. त्यानंतर दोघांचेही कुटुंब उदयपूरला पोहोचले चालू होती आणि या विवाहाची आखणी चोख प्रगतीपथावर होती. इरा आणि नुपूरचा विवाह महाराष्ट्रीय पद्धतीनुसार संपन्न होणार होता.ल अशी सर्वांनाच अपेक्षा होती कारण नुपूर मराठी कुटुंबातून येतो. मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देत या जोडप्याने हिंदू किंवा मुस्लिम असा कोणताही मार्ग निवडला नाही तर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयरा खानने व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूरने क्रीम कलरचा ब्लेझर सूट परिधान केला होता. या लूकमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत होते. या कपलने एकमेकांच्या हातामध्ये हात घालून जबरदस्त एन्ट्री केली. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्याच होत्या.

त्यानंतर या दोघांनी सर्वांसमोर कपल डान्स केला. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसले. या कलपच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर दोघांचेही चाहते कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. एकीकडे काही जण या लग्नाचे कौतुक करत आहेत तर काहिंनी ख्रिश्चन वेडिंगवरून दोघांनाही ट्रोल देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT