टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही टीममध्ये हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी जबरदस्त फलंदाजी केली.
हा सामना सर्व भारतीयांसाठी खूपच महत्वाचा आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सध्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हे स्टेडिअम फुलले आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर क्रिकेट आणि फुटबॉलसह इतर अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे सामना पाहताना दिसत आहेत.
इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमवर आला आहे. याव्यतिरिक्त भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर देखील सामना पाहण्यासाठी आला आहे. टीम इंडिया विरुद्ध या रोमांचक सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी सेलिब्रिटींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. सध्या हे सेलिब्रिटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, रणबीर कपूर, रजनीकांत, व्यंकटेश डग्गुबती, विकी कौशल, जॉन अब्राहम, कुणाल केमू, सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी कियारा आडवाणीसोबत आणि शाहीद कपूर पत्नी मीरा राजपुतसोबत आला आहे. वानखेडे स्टेडियमवर सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी, जॉन अब्राहम आणि रणबीर कपूर एकचा ठिकाणी बसलेले दिसत आहेत. यासोबतच प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आणि निया शर्मा हे देखील हा सामना पाहण्यासाठी आल्या आहेत.
तसेच भारत-न्यूझीलंड पांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह इतर क्षेत्रातील अनेक नावाजलेले चेहरे स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांच्या पत्नी स्टेडियममध्ये सामना पाहताना दिसत आहेत. सध्या हा सामना खुपच जबरदस्त होत आहे. विराट कोहलीने या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजी धुलाई केली. त्याने या सामन्यात ११७ धावा केल्या. तर शुभमन गिल ७८ वर परतला. तर श्रेयस अय्यरने आतापर्यंत १०० धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.