Amitabh Bachchan  Instagram/ @amitabhbachchan
मनोरंजन बातम्या

World Cup 2023: तुम्ही वर्ल्डकप फायनल बघू नका', चाहत्याने अमिताभ बच्चन यांना असा का दिला सल्ला?

Fans Advise To Amitabh Bachchan: नुकताच अमिताभ बच्चन यांनी वर्ल्ड कप २०२३ च्या सेमी फायनलमध्ये भारताचा विजय झाला याबद्दलची पोस्ट केली आहे.

Priya More

Amitabh Bachchan Tweet Viral:

वर्ल्डकप २०२३ च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझिलंडचा दारूण पराभव केला. या मॅचकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर मोठी गर्दी झाली होती. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मॅचचे साक्षीदार होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली.

सलमान खान, विकी कौशल, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, निया शर्मा हे सेलिब्रिटी मॅच पाहण्यासाठी आले होते. बॉललिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना हा सामना पाहता आला नाही. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यावर कमेंट्स करत एका चाहत्याने त्यांना सल्ला दिला आहे

अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. या माध्यमातून ते चाहत्यांना त्यांच्या प्रोजेक्सटचे अपडेट्स, दैनंदिन अनुभव आणि एखाद्या विषयावर मत मांडत असतात. नुकताच त्यांनी वर्ल्ड कप २०२३ च्या सेमी फायनलमध्ये भारताचा विजय झाला याबद्दलची पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, 'जेव्हा मी मॅच पाहत नाही तेव्हा भारताचा विजय होतो.' त्यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने बिग बींना सल्ला देखील दिला आहे. एका चाहत्याने डोळ्यावर पट्टी बांधलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करत म्हटले, 'अमिताभ सर कृपया रविवारी असेच राहा.' तर एका चाहत्याने 'धन्यवाद सर, तुम्ही हा सामना पाहिला नाही' असे लिहिले आहे. तर आणखी एका चाहत्याने 'कृपया फायनल पाहू नका.', असा सल्ला दिला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत आहेत. ते'गणपत' चित्रपटात टायगर श्रॉफच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अमिताभ लवकरच 'कल्की 2898' या चित्रपटात क्रिती सेनन आणि प्रभाससोबत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

Raigad Politics : गोगावलेंचा तटकरेंना जोरदार धक्का, कट्टर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Kolhapur Mystery : बिबट्याचा हल्ला की घातपात? कोल्हापुरात रहस्यमय मृत्यू, कंक दांपत्याच्या मृत्यूमागे गुढ वाढले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT