Jaya Bachchan, Navya Naveli Nanda Latest Bollywood News/file saam tv
मनोरंजन बातम्या

लग्न न करता आई झालीस तरी मला प्रॉब्लेम नाही, नात नव्याला असं का म्हणाल्या जया बच्चन?

अभिनेत्री जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदा हिला रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला आहे.

साम ब्युरो

Bollywood News : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता पुन्हा त्यांच्या वक्तव्याने त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा यांच्यात खास बॉडिंग आहे आणि त्या नेहमीच त्यांच्यातील नात्याबद्दल किंवा नव्याबद्दल मोकळेपणाने बोलत असतात.

आता जया बच्चन यांनी आपली नात नव्याला रिलेशनशिपबद्दलचा सल्ला दिला आहे. त्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे. जया बच्चन यांनी असं वक्तव्य का केलं, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.

जया बच्चन यांनी आपली नात नव्या नवेली नंदाचा पॉडकास्ट What The Hell Navya यावर बोलताना रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी शारिरीक आकर्षण खूपच गरजेचे आहे. मात्र, त्यांच्या काळात त्याबाबत फार एक्सपेरिमेंट करू शकत नव्हत्या, असेही त्या म्हणाल्या.

नात्यात फिजिकल रिलेशनशिप (Relationship) असणे खूपच गरजेचे आहे, असेही जया बच्चन म्हणाल्या. कोणतंही नातं केवळ प्रेम, फ्रेशनेस आणि अॅडजस्टमेंटवर चालत नाही, असेही त्या म्हणाल्या. जर नव्या लग्न न करताच आई झाली तर त्यात मला कोणताही प्रॉब्लेम नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. (Bollywood News)

माझ्या अशा बोलण्यावर अनेकांना आक्षेप असेल. मात्र, फिजिकल अॅट्रॅक्शन आणि कंपॅटिबिलिटी दोन्ही खूपच गरजेच्या आहेत. आमच्या वेळेला आम्ही असे खूप बदल करू शकत नव्हतो. मात्र आजची पिढी ते करते आणि त्यांनी का करू नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर फिजिकल रिलेशनशिप नसेल तर ते नाते खूप काळ टिकू शकत नाही. केवळ प्रेम आणि अॅडजस्टमेंटच्या भरवशावर नातं फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे हे खूप गरजेचे आहे, असं मला तरी वाटतं, असे जया बच्चन म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT