Salman Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan च्या नावावर कास्टिंग फसवणूक, अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊसने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Salman Khan Production House: सलमान खानच्या टीमने कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग केले नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे. मागच्या वर्षीही सलमान खानच्या नावाने कास्टिंग करण्याबाबत फसवणूक झाली होती.

Priya More

Fake Casting Calls Case:

बॉलिवूडचा (Bollywood) 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानबाबच्या (Salman Khan) प्रोडक्शन कंपनीच्या नावाने फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कास्टिंगबाबत झालेल्या फसवणुकीवर सलमान खानच्या प्रोडक्शन कंपनीने एक स्टेटमेंट जारी केले आहे. सलमान खानच्या टीमने कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग केले नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे. मागच्या वर्षीही सलमान खानच्या नावाने कास्टिंग करण्याबाबत फसवणूक झाली होती. तेव्हा देखील त्याच्या प्रॉडक्शन हाऊसला निवेदन जारी करावे लागले होते.

चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता सलमान खान चित्रपट निर्मिती आणि वितरणाशीही संबंधित आहे. यासाठी त्याने २०११ मध्ये सलमान खान फिल्म्स (SKF) नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. त्याच्या या प्रोडक्शन हाऊसच्या नावानेच कास्टिंग फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच सध्या सलमान खानचे प्रोडक्शन हाऊस चर्चेत आले आहे.

सलमान खानच्या वतीने, त्याच्या प्रोडक्शन हाऊसने एक निवेदन जारी केले आणि कॅप्शनमध्ये अधिकृत माहिती लिहिली. या पोस्टमध्ये सलमानच्या प्रोडक्शन हाऊसने लिहिले की, 'सलमान खान किंवा सलमान खान फिल्म्स सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्ट करत नाहीत. आम्ही आमच्या भविष्यातील कोणत्याही चित्रपटासाठी कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती केलेली नाही. कृपया कास्टिंगबाबत प्राप्त झालेल्या कोणत्याही ईमेल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.'

फसवणूक करणाऱ्यांना इशारा देत सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसने सांगितले की, 'जर कोणत्याही पार्टीने मिस्टर खान किंवा SKF यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास, कायदेशीर कारवाई केली जाईल.' दरम्यान, सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली आतापर्यंत अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'चिल्लर पार्टी होता' ज्याचे दिग्दर्शन नितीश तिवारी यांनी केले होते. तसंच, नुकताच प्रदर्शित झालेला 'फरे' हा चित्रपटही या प्रोडक्शन हाऊसने तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT