Sahil Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अडकला 'स्टाइल' फेम अभिनेता, माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Case Register Against Sahil Khan: या प्रकरणात आता 'स्टाइल' फेम अभिनेता साहिल खानचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

Actor Sahil Khan:

महादेव बेटिंग अ‍ॅप (Mahadev App Case) प्रकरणामुळे अनेक बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींच्या अडचणी वाढत चालेल्या आहेत. या प्रकरणात एकापाठोपाठ एका सेलिब्रिटीचे नाव पुढे येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी या अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याच्यासह ३१ जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीसह विविध कलामांतर्गत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात आता 'स्टाइल' फेम अभिनेता साहिल खानचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साहिल खानवर महादेव अ‍ॅपचे प्रमोशन करत त्यातून मोठा नफा कमावल्याचा आरोप आहे. त्याचसोबत त्याच्यावर महादेव बेटिंग अ‍ॅपशीसंबंधित आणखी एक बेटिंग अ‍ॅप चावल्याचा आरोप आहे. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर साहिलविरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्याने लोकांची १५ हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि १२०(ब) व्यतिरिक्त जुगार कायदा आणि आयटी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटनेस मास्टर साहिल खानवर आपल्या प्रभावाचा वापर करून सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी आणि अ‍ॅपच्या प्रचारासाठी पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास सुरू आहे.

सध्या अ‍ॅप ऑपरेटर म्हणून साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिलाडी नावाचे बेटिंग अ‍ॅप चालवल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईत झालेल्या या बेटिंग अ‍ॅपच्या पार्टीतही तो दिसला होता. त्यामुळे आता याप्रकरणात साहिल खानच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. दरम्यान, साहिल खानने 'स्टाइल' चित्रपटाव्यतिरिक्त 'अलादीन' आणि 'डबल क्रॉस' सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT