Brijesh Tripathi Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brijesh Tripathi Death: दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बॉलिवूडवर शोककळा

Brijesh Tripathi Death Due To Heart Attack: ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सध्या ब्रिजेश त्रिपाठी यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Priya More

Brijesh Tripathi Passed Away:

बॉलिवूड (Bollywood) आणि भोजपुरी सिनेसृष्टीतून (Bhojpuri Film Industry) दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी (Brijesh Tripathi) यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सध्या ब्रिजेश त्रिपाठी यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांना दोन आठवड्यापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ब्रिजेश त्रिपाठी मुंबईमध्ये आले होते. मुंबईमध्ये त्यांचे कुटुंबीय राहतात. पण रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले.

ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या वृत्ताने भोजपुरी सिनेसृष्टीला धक्का बसला. रवी किशनसह अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियावर अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांना भोजपुरीतील भीष्म पितामह म्हटले जात होते. महत्वाचे म्हणजे, ब्रिजेश त्रिपाठी हे 46 वर्षांपासून भोजपुरी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. पवन सिंग, दिनेश लाल यादव आणि इतर इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्ससोबत त्यांनी काम केले होते. त्यांनी आतापर्यंत भोजपुरी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.

ब्रिजेश त्रिपाठी यांनी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, रवी किशन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये 250 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. ब्रिजेश त्रिपाठी मित्राच्या मदतीने चित्रपटसृष्टीत आले होते. बृजेश त्रिपाठी यांनी 'नो एन्ट्री', 'ओम', 'गुप्ता: द हिडन ट्रुथ', 'मोहरा', 'देवरा भईल दीवाना', 'हमार बॉडीगार्ड शिवा', 'ड्राइवर राजा', 'पिया चांदनी', 'राम कृष्ण बजरंगी' आणि 'जनता दरबार' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT