Sanjay Raut News: 'पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव, मोर्चा निघू नये म्हणून दिल्लीतून दबाव..' राऊतांचे गंभीर आरोप

Shivsena Thackeray Gruop Protest Against Adani Group: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार आहे. मात्र हा मोर्चा होऊ नये म्हणून दिल्लीतून दबाव असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.
Sanjay Raut Todays news
Sanjay Raut Todays news Saam TV
Published On

मयुर राणे, मुंबई|ता. १६ डिसेंबर २०२३

Sanjay Raut News:

अदानी उद्योग समूहाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने दंड थोपाटले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाकडून अदानीं विरोधात मोर्चाचे आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघणार आहे. मात्र हा मोर्चा होऊ नये म्हणून दिल्लीतून दबाव असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.

काय म्हणाले संजय राऊत?

"हा मोर्चा शिवसेनेचा (Shivsena) आहे. हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही तर पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment) नावाखाली मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. "गुजराती लॉबी यामागे मोठी आहे. धारावीतील गरीब लोकांना घर मिळायला हवीत ते जिथे राहतात तिथे त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी. मोठ्या प्रमाणात इथे ड्रग्स उतरत आहे. त्यांना इथे ड्रग्सचा वापर करायचा आहे का?" असा सवालही राऊतांनी यावेळी केला.

दिल्लीतून दबाव..

"अदानींविरोधात मोर्चा निघु नये यासाठी दिल्लीतून महाराष्ट्र सरकारवर दबाव आहे. धारावीच्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर दबाव आहे. तो दबाव झुगारून आम्ही मोर्चा काढतोय. धारावीच्या जनतेच्या तोंडाल पाने पुसून मुंबई लुटण्याचा हा डाव आहे.." असा घणाघात राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut Todays news
Ravikant Tupkar News: 'सरकारला ईंगा दाखवू...' रविकांत तुपकरांचा इशारा; नागपूर अधिवेशनावर करणार हल्लाबोल आंदोलन

मोर्चाची जय्यत तयारी!

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहालाच्या कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा उद्या निघेल. या मोर्चात एक ते दीड लाख लोक सहभागी होतील... असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मोर्चाला संबोधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut Todays news
Bhandara Traffic : नो ट्रॅफिक जाम! वाहतूक कोंडीवर उतारा, महामार्गावरील अवजड वाहतूक भंडारा शहराबाहेरून वळवली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com