राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा होणारी वाहतूक कोंडी, रोजच्या अपघाताच्या घटना यावर आता जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या संकल्पनेतून भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून होणारी जड-अवजड वाहतूक प्रायोगिक तत्वावर आजपासून सकाळी आठपासून वळवण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भंडारा (Bhandara) शहरातून राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, जड-अवजड वाहनांची (Heavy Vehicle) वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहनांच्या संख्येचा विचार केला असता, रस्ता अरुंद असल्यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते.
नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रुग्णवाहिका, व्हीआयपींच्या वाहनांच्या ताफ्याला मार्ग देताना नेहमीच अडचण होत असते. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नागपूरकडून भंडारामार्गे लाखनी साकोलीकडे जाणारी वाहतूक यापुढे नागपूरवरून रामटेकमार्गे कांद्री जांब खापा - देव्हाडा - तेथून पुढे साकोली - लाखनी किवा तिरोडा गोदियामार्गे पुढे जाईल.
गोंदिया, तिरोडा, अदानी प्लान्ट, तुमसरकडून भंडारामार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक तुमसरच्या खापा चौकातून जांब - कांन्द्री - रामटेकमार्गे नागपूरकडे निघेल.
साकोली-लाखनीकडून भंडारामार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक आता भंडारा शहरातून न जाता लाखनीवरून केसलवाडा - अड्याळ - पवनीमार्गे भिवापूर उमरेड- नागपूरकडे जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.