Virat Kohli, Anushka Sharma  Instagram @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Baby Bump: अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?, अभिनेत्रीचा बेबीबंप दिसला, VIDEO पाहून चाहते उत्सुक

Anushka Sharma And Virat Kohli Video: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अनुष्काचा बेबीबंप दिसत आहे.

Priya More

Virat Kohli And Anushka Sharma:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली हे बॉलिवूडपासून ते क्रिकेट जगतातील प्रसिद्ध स्टार कपलपैकी एक आहे. हे कपल सर्वांचे आवडते कपल असून सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चात होत असते. हे कपल खूपच वेगळे आहेत. त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य सर्वांसमोर शेअर करायला फार आवडत नाही. त्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर आणि मीडियासमोर येणं टाळतात.

अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. पण या कपलने या चर्चांचे खंडन केले होते. पण आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अनुष्काचा बेबीबंप दिसत आहे. हे पाहून दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत.

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत होते. हे फोटो आणि व्हिडीओमधून हेच दिसत होते की अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण या कपलने अधिकृत घोषणा केली नाही. त्याचसोबत त्यांनी प्रग्नेंसीचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले होते. पण अशामध्ये आता 9 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री आई होणार असल्याची दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्याही चाहत्यांनी जोरदार कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

९ नोव्हेंबर रोजी एका सोशल मीडिया यूजरने अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीसोबतचा एक व्हिडिओ Reddit वर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये, हॉटेलमध्ये येताना अभिनेत्री सावधपणे पोटावर हात लावून चालत असताना दिसत आहे. अनुष्का विराटचा हात पकडून हळूहळू चालत असल्याचे दिसत आहे. अनुष्काने बलून स्लीव्सवाला ओवरसाइज्ड शिफ्ली ड्रेस घातला आहे. कंफर्टेबल राहण्यासाठी तिने तिचा ड्रेस ब्लॅक स्ट्रॅपी फ्लॅटने स्टाईल केला आहे. लाईट मेकअप आणि मोकळे केस सोडत अनुष्काने आपला लूक परिपूर्ण केला होता. या लूकमध्ये ती क्यूट दिसत आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, चाहते एका व्हायरल व्हिडिओबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत. ज्यामध्ये अनुष्का नुकताच विराटसोबत बंगळुरूमध्ये तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट कोहली आउटिंग दरम्यान हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. अनु्ष्का आणि विराटच्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्माला पाहून नेटिझन्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

अभिनेत्री प्रग्नेंट असल्याचा दावा ते करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'बाळ होणार आहे का?' दुसर्‍या युजरने कमेंट केली की, '100 टक्के प्रग्नेंट आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले, 'अरे.. अनुष्का आधीच प्रेग्नंट आहे. मी इतकी लहान आहे की माझ्या गरोदरपणात मी पेंग्विनसारखी दिसत होती. तर एका नेटिझनने विराट आणि अनुष्काने त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा कशी केली नाही याचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT