Animal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Twitter Review: रणबीर कपूरच्या धासू एन्ट्रीने जिंकलं प्रेक्षकांचं मन, नेटकऱ्यांनी 'अ‍ॅनिमल'ला म्हटलं मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट

Ranbir Kapoor And Rashmika Mandanna: पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांनी चित्रपटगृह हाऊसफुल केले.

Priya More

Animal Movie Released:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट (Animal Movie) आज म्हणजेच 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट रणबीर कपूरचा २०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली.

या चित्रपटाच्या पहिल्याच शोला प्रेक्षकांनी चित्रपटगृह हाऊसफुल केले. पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासोबतच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे रिव्ह्यू शेअर (Animal Twitter Review) करण्यास देखील सुरुवात केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असून बॉबी देओल विलनच्या भूमिकेत आहे. अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. या चित्रपटातील स्टारकास्टचे लूक, टीझर आणि ट्रेलर पाहिल्यापासूनच चाहते चित्रपटाच्या प्रेमात पडले होते. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील प्रेक्षकांकडून चांगले प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणि आनंद आता चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटातील रणबीर कपूरची धमाकेदार एन्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. रणबीरच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे. 'अ‍ॅनिमल'चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटाबाबत दिलेल्या रिव्ह्यूनुसार, अनेक जण चित्रपटाचे कौतुक करत आहे. त्याचसोबत चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, 'हा उत्कृष्ट मास्टरपीस पाहणे चुकवू नका.' दुसर्‍याने चित्रपटातील फायटिंगच्या दृश्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत लिहिले की, 'या फायटिंगच्या दृश्यामुळे चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडाली आहे.' तसंच, या चित्रपटाचे दिग्दर्शनक संदीप रेड्डी वांगा यांचे देखील प्रेक्षक कौतुक करत आहेत.

चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. एका महिला प्रेक्षकाने सांगितले की, हा चित्रपट फक्त तरुणांसाठी नाही. तर संपूर्ण फॅमिलीसाठी हा चित्रपट आहे. हा चित्रपट खूपच भावनिक आहे. रणबीरचा अभिनय खूपच जबरदस्त आहे.' दरम्यान, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. पहिल्याच दिवशी १ मिलियन अ‍ॅडव्हान्स तिकीट विकणारा 'अ‍ॅनिमल' हा २०२३ मधील तिसरा बॉलिवूडचा चित्रपट ठरला आहे. अशापद्धतीने रणबीर कपूर हा १ मिलियन क्लबमध्ये सुपरस्टार शाहरुख खानसोबत सहभागी झाला आहे. शाहरुख खानच्या जवान आणि पठाण चित्रपटाने रिलीजपूर्वीच १ मिलियन अ‍ॅडव्हान्स बुकिंग स्कोर पूर्ण केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT